प्रतिनिधी:- वाल्मीक सुर्यवंशी
शि.आंनतपाल/प्रतिनिधी: पंचायत समितीतील एकात्मिक महिला बाल सेवा कार्यालयातील कर्मचाऱ्यासह पंचायत समितीच्या प्रत्येक आस्थापनेत एक एक कर्मचारी अधिकारी एकाच ठिकाणी आठ आठ वर्षे कार्यरत असल्यामुळे त्यांची मजुरी वाढली आहे. लोकांचा संपर्क मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलंआहे.अश्या कारणामुळे लोकांची आर्थिक प्रचंड लूट होऊ नये म्हणून नियमानुसार तीन चार वर्षात यांच्या प्रशासकीय बदल्या होणेअपेक्षित आहे .मात्र देवणी पंचायत समितीतील कर्मचारी अधिकारी यांच्यावर लातूर जिल्ह्याचे सामान्य प्रशासनGDमेहरबान आहे. त्यामुळे देवणी पंचायत समितीच्या कर्मचारी अधिकारी यांच्या बदल्या होतं नाहीत लातूर जिल्ह्यातील सामान्य प्रशासन विभागाकडे देवणी पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांच्या नोंदी तरी आहेत का नाही. अशी शंका निर्माण झाली आहे. या कर्मचारी यांच्यावर नेमका वरदहस्त कोणाचा अशी चर्चा संपूर्ण देवणी तालुक्यात होत आहे .
सविस्तर माहिती की जिल्हा परिषदेतील प्रत्येकआस्थापनेतील कर्मचारी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभाग काम करीत असते मात्र लातूर जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी यांनी नंगानाच चालू केला आहे. कोणत्या कर्मचाऱ्याना त्यांच्या सोबत आर्थिक गैरव्यवहार करून त्यांच्या सोईनुसार कोठे किती दिवस ठेवायचे हे मात्र सामान्य प्रशासन विभाग मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या परस्पर ठरवित आहेत .त्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी यांची परिस्थिती मेरे अंगणे मै तुम्हारा क्या काम है अशी केली आहे. सामान्य विभागातील भ्रष्ट अधिकारी यांच्यावर शासकीय नियमाचा भंग करून अनधिकृत कर्मचारी यांच्यावर अर्थपूर्ण दूर लक्ष करणाऱ्या अधिकारी कर्मचारी तसे होतांना दिसत नाही देवणी पंचायत समितीतील ठाण मांडून बसणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची तात्काळ हाकल पट्टी करण्याची मागणी देवणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात होतं आहे
Discussion about this post