शिरुर आनंतपाळ..प्रतिनिधी
शिरुर अनंतपाळ येथील शिवनेरी महाविद्यालयात कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा हे जन गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला.याआनंदमय प्रसंगी कुसुमाग्रज यांच्या प्रतीमेचे पुजन व पुष्पहार प्राचार्य डॉ.धालगडे यांच्या शुभ हस्ते अर्पण करण्यात आला. यावेळी मराठी विभागाचे विभाग प्रमूख प्रा.गोरोबा रोडगे सर यांनी कुसुमाग्रज यांच्या काव्यलेखनावर सविस्तर असे त्यानंच्या मधूर वाणीतून मनोगत व्यक्त केले. कुसुमाग्रज यांनी मराठी कवितेला एका नव्या उंचीवर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन मराठी विभाग प्रमूख प्रा.गोरोबा रोडगे यांनी केले. या कार्यकमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.धालगडे यांनी केला.सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन डॉ.मारोती गायकवाड यांनी केले .तर आभारप्रदर्शन मराठीची विद्यार्थिनी कु. आश्विनी पवार यांनी मानले.या कार्यकमास महाविद्यालयातील प्राध्यापक व सर्व कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
Discussion about this post