महाराष्ट्र शासनाच्या रोजगार विषयक धोरणाचा भाग म्हणून युवकांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा या हेतूने २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता चरखा भवन, सेवाग्राम रोड, वर्धा येथे पंडित दीनदयाळ भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे. मेळावा २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता
चरखा भवन, सेवाग्राम रोड, वर्धा येथे आयोजित करण्यात आलेला आहे. मेळाव्यात महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून यामध्ये वैभव इंटरप्रायझेस, नागपूर, इंडोरामा सिंथेटिक, बुटीबोरी, नागपूर, टाटा स्टाइव्ह, नागपूर, धूत ट्रान्समिशन, छत्रपती संभाजी नगर, पी. व्ही टेक्सटाइल, जाम, जि. वर्धा, संसूर श्रुष्टी प्रा.ली, वर्धा, रेकोन कोन्क्रेट प्रा. ली, नागपूर, स्टोप कँसर मिशन प्रा.ली. नागपूर, लीओ अँड सागीटेरीअस प्रा. ली, मुंबई, पटले स्कील प्रा. ली, नागपूर, द युनिव्हर्सल ग्रुप, नागपूर, ग्रामप्रो बिजनेस प्रा.ली, नागपूर, टेझटेक आई.टी प्रा.ली, नागपूर इत्यादी
नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहे. मेळाव्यात बारावी, आय.टी.आय, पदवी, पद्युत्तर, पदविका इत्यादी १८ ते ३५ वर्ष वयोगटातील तरून तरुणींना या संधीचा लाभहोणार आहे.
त्यांच्या कौशल्याच्या आधारे उपस्थित असलेल्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी मुलाखती घेऊन निवड करतील तसेच प्रत्यक्ष नियुक्ती पत्रांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या
हस्ते होणार आहे. या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने जिल्ह्यातील तरुण तरुणींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त नीता औघड यांनी केले आहे.
Discussion about this post