मोहोळ येथे शुक्रवार 23 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केले
शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाची जनसन्मान यात्रा मोहोळ येथे दाखल होणार असून येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार जाहीर सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला 09 ऑगस्ट पासून नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघातून सुरुवात झाली होती,या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजितदादा पवार जिल्हानिहाय दौरा करत महाराष्ट्र पिंजून काढत आहेत,ही जनसन्मान यात्रा दिनांक 23 ऑगस्ट रोजी मोहोळ तालुक्यात येणार असल्याची माहिती लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. दुपारी 2.30 वाजता स्वातंत्र्यसेनानी संदिपान (दादा) गायकवाड मंगल कार्यालय मोहोळ या ठिकाणी भव्य जाहीर सभा आयोजित केली आहे.या निमित्ताने ते मोहोळ विधानसभेचा आढावा घेणार आहेत तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर अजितदादा पवार या यात्रेच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील महिलांशी संवाद साधणार आहेत.
मोहोळ तालुक्यातील सर्वांना लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत माने, बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे
Discussion about this post