जिल्हास्तरीय परिक्षेचे बक्षिसही झाले वितरीत
प्रा.दिलीप नाईकवाड सिंदखेडराजा: तालुका प्रतिनिधी
मेहकर कृषी वैभव लॉन येथे सालाबादप्रमाणे संभाजी ब्रिगेडच्या पुढाकारातुन मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद आयोजित शिवजयंती प्रबोधनपर्व कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने करुन उपस्थित मान्यवरांचे पुस्तकरुपी विचारपुष्प देत स्वागत करण्यात आले. यानंतर पहील्या सत्रात शेतकरी मित्र प्रसिद्ध युट्युबर ज्ञानेश्वर खरात यांचा शेतकरी संवाद कार्यक्रम पार पडला.त्यांनी आज शेतकऱ्यांच्या होत चाललेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधत शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भ्रष्ट आमदार, मंत्री यांना कोणत्याच सरकारने पाठीशी घालायला नको असे विचार मांडले.यानंतर प्रसिद्ध शिवव्याख्याते तुषार उमाळे यांचा “शिवचरित्र एक लोकचळवळ” या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.त्या मध्ये उमाळेंनी छत्रपती शिवराय कसे वैज्ञानिक दृष्टिकोण जोपासणारे व त्या काळानुसार अत्यंत आधुनिक होते. त्याचबरोबर शिवरायांनी कधीच अंधश्रद्धा जोपासली नाही. अशाप्रकारे शिवचरित्राचा जागर आपल्या व्याख्यानातुन केला.यानंतर सावित्री जिजाऊ जन्मोत्सवानिमीत्त “वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद व संभाजी ब्रिगेड” यांच्या माध्यमातुन घेण्यात आलेल्या सावित्री जिजाऊ जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान परिक्षेचे बक्षिस वितरण पार पडले. यामध्ये गट”अ” वर्ग ५ ते ८ या गटामध्ये पहीली कु.आचल झाल्टे .सहकार विद्या मंदीर सिंदखेडराजा, दुसरी कु.शामल आढाव .महेश विद्या मंदिर मेहकर ,.तर तृतीय कु.निशा जाधव.बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी ,यांना अनुक्रमे लॅपटॉप, कंम्प्यूटर व सायकल ही बक्षिसे प्रदान करण्यात आली.गट”ब” वर्ग ९-१२ यामध्ये पहीला चि.आदर्श जाधव.श्री शिवाजी हायस्कुल मेहकर, द्वितीय कु.स्नेहा निकम.जिजामाता विद्यालय हिवराखुर्द,.तर तृतीय कु.ऋतुजा डगडाळे.श्री सरस्वती विद्यालय जानेफळ.यांना अनुक्रमे लॅपटॉप,स्टडीटॅब व सायकल ही बक्षिसे प्रदान करण्यात आली.



यांमध्ये लॅपटॉप हे डॉ.आर.एन.लाहोटी गृप ऑफ कॉलेजेस् व आयोजन समितीच्या वतीने,तर कंम्प्यूटर हे विश्वजित कंम्प्यूटरचे संचालक मंगेश पाचरने यांचे कडुन तर सायकल ह्या डॉ.गजानन शेळके व डॉ.शेळके मॅडम.विजय नेत्रालय व मेहकर पोलीस स्टेशनचे पीएसआय सम्राट ब्राम्हणे यांचेकडुन देण्यात आले.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत तहसीलदार निलेश मडके, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रतिनिधी म्हणून ऋषि जाधव, समाजसेवक तुळशीराम मानघाले पाटील,कषीवैभव लॉनचे संचालक महेश पाटील रिंढे, शिवसेना उबाठा शहप्रमुख किशोर गारोळे, माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या वतीने निरज रायमुलकर,तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.मनोहर तुपकर महासचिव मराठा सेवा संघ महाराष्ट्र ह्यांची उपस्थिती होती.
सदर परिक्षा व कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेड जिल्हाकार्याध्यक्ष पांडुरंग पाटील,वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद ता.अध्यक्ष गोपाल गरड,संभाजी ब्रिगेड ता.अध्यक्ष धनंजय बुरकुल, गजानन पवार,महेशबाप्पु देशमुख, सुनिल वाघमारे मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र पवार,ता.अध्यक्ष विश्वनाथ बाहेकर, समाधान शिंदे, परमानंद गारोळे, महादेव ससाने आदींनी विषेश मेहनत घेतली तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता देशमुख,मंगलताई कुटे,काजल गारोळे आदींचं सहकार्य लाभले.यावेळी शेकडो श्रोत्यांनी सभागृह गच्च भरले होते.
Discussion about this post