प्रा. दिलीप नाईकवाड सिंदखेडराजा: तालुका प्रतिनिधी
कळंबेश्वर संस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमा साठी मेहकर मतदार संघाचे आमदार मा. सिद्धार्थ खरात यांची विशेष उपस्थिती होती.
कळंबेश्वर येथे कमलेश्वर मंदिरासाठी तीर्थक्षेत्र विकास योजना 2007 मध्ये सुरू करण्यात आली. असून या योजनेचा लाभ क दर्जा असलेल्या कमलेश्वर संस्थांनसाठी निधी मंजूर करण्यासाठी होऊ शकतो. प्रकल्प सादर करण्याचे आणि मंजूर करण्याचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आश्वासन दिले असून येथे बाजार संकुलासाठी तसेच व्यायामशाळा, विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, दूध डेरी, अशा अनेक विकास योजना कार्यान्वित करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी याप्रसंगी दिले . त्यांच्या सोबत माजी जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, दिलीप खरात, गणेश अवचार, सुभाष खुरद, त्रंबक भाकडे, रमेश भाकडे, नारायण इंगळे, गायकवाड मामा, राजू शेठ खत्री, संदीप भाकडे , संजू लामधाडे, सामाजिक कार्यकर्त्या भाकडे ताई आणि अनेक महिला उपस्थित होत्या.
Discussion about this post