- अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजना साल सन 2024-2025 अंतर्गत होत असलेल्या शादीखाना बांधकामाबाबत ताबडतोब थांबवा नसता आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी:- रमेश जगताप
भोकरदन प्रतिनिधी कठोरा बाजार येथील फारखखा अजमे पठाण जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीमध्ये कठोरा बाजार येथील होत असलेल्या शादी खाण्याचे बांधकाम तात्काळ थांबवा नसता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे वरील विषयी तक्रार अर्ज सादर करण्यात येतो की, मौजे कठोरा बाजार ता. भोकरदन जि. जालना येथील ग्रामपंचायत हद्दीमध्ये अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजना साल सन 2024-2025 अंतर्गत शादीखानासाठी निधी आलेला असुन, सदरील शादीखान्याचे बांधकाम चालु आहे मात्र सदरील बांधकाम हे या अगोदरच असलेल्या पुर्वनियोजीत जि.प.प्राशाळा कठोरा बाजारच्या प्रांरंगणात बांधने चालु आहे मुळतः सदरील शादीखाना बांधकामाकरीता ग्रामपंचायतीने दुसऱ्या ठिकाणी जागा नियोजित करणे आवश्यक आहे. मात्र संबधीत ग्रामविकास अधिकारी तथ सरपंच यांनी दुसऱ्या ठिकाणी जागा पाहणे टाळुन त्यांनी या अगोदरच असलेलया जि.प.प्रा शाळेच्या प्रारंगणात शादीखाना बांधकाम चालु केले आहे सदरील शादीखानामुळे या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अभ्यासावर परिणाम तर होईलच तसेच त्यांना खेळण्यासाठी जागा सुध्दा अपुरी पडेल तसेच शासनाचे एका जागेवर परत शासनाचे दुसरे बांधकाम करणे चुकीचे व बेकायदेशीर आहे.
करीता सदरील संबंधाने आपण लवकरात लवकर चौकशी करुन, सदरील चालु असलेले बांधकाम तात्काळ थांबवावे व दुसऱ्या ठिकाणी सदरील शादीखाना बांधण्यासाठी नसता लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल आशा इशारा
फारखखा अजमेरखा पठाण
या अर्जाची प्रत पंचायत समिती यांना दिलेला तक्रार अर्ज
उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरदन यांना दिलेला अर्ज
मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. जा गटशिक्षण अधिकारी साहेब, कार्यालय भोकरदन विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात आली आहे
Discussion about this post