प्रतिनिधी असलम शेख रत्नागिरी
रत्नागिरी ‘ . सध्या सर्वसामान्य प्रवाशांचा सोयीसाठी असलेले एस टी महामंडळ भ्रष्टाचार आणि अन्याय, बलात्कार, लुट करणाऱ्या गुंडाना , चोरांना मुभा देणारे महामंडळ झाले आहे. एकतर महामंडळाची स्थावर मालमत्ता महाराष्ट्रात तिन लाख कोटीच्या वर आहे. आणि जंगम मालमत्ता सर्व मिळून सुमारे सव्वा लाख कोटी आहे तरिही ड्रायव्हर , कंडक्टर, मॅन्यानीक, शिपाई यांना मिळणाऱ्या तुटपुंजा पगारावरच दर महिना कर्ज काढून संसाराचा गाढा हाकावा लागतोय हे अजब अतार्किक अर्थशास्त्र शोधुन काढणाऱ्या या सरकारची आणि प्रशासनाची कशाने पुजा केली पाहिजे ते जनतेनेच ठरवावे . ही एक बाजू रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाची आहे त्याच बरोबर प्रवासी जनतेची बाजू तर फारच भिषण आहे. जेंव्हा सन वार , सुट्या असतात तेव्हा तर गाड्यांच्या उपलब्धे बाबत आणि वेळे बाबत नियोजन शुन्यच असते . असा नेहमीचाच अनुभव जनतेला घ्यावा लागतो . त्यात आता महिला प्रवासी आणि अल्पवयीन मुली , महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न फारच गंभिर बनला आहे . कोणत्याही एस टी स्टँड वर गाडी लागली की प्रवासी दरवाज्याजवळ गर्दी करतात .
प्रत्येकाला जाण्याची घाई असते पण तेव्हा होणारी धक्का बुक्की पाकीट चोरी , चैन , मंगळसुत्र चोरी हे कोठेना कोठे घडतच असते . तिथे महाराष्ट्र पोलिस दलाचे एखादे दुसरे पोलिस असतात पण ते ही सर्व ठिकाणी लक्ष देवू न शकलेने हतबल होतात . महामंडळाच्या वरिष्ठ प्रशासनाने आणि राज्य सरकारने प्रवासी जनतेच्या सुरक्षतेसाठी स्थानिक पोलीस दलावर पूर्ण अवलंबून न राहता स्वतंत्र पणे रेल्वे पोलीस धर्तीवर पोलिस दल उभारावे . तरच 14 कोटी जनते पैकी किमान 11 कोटी जनता ज्या परिवाहन मंडळावर प्रवासा साठी अवलंबून असते त्यांचे साठी परिवाहन पोलिस दल स्वतंत्र पणे निर्माण करावे अशी मागणी मा. अशोकराव जाधव महाराष्ट्रातील काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि संस्थापक अध्यक्ष शेतकरी – कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य यानी केली आहे. याबाबत अशोकराव जाधव पुढे म्हणाले की महाराष्ट्रात प्रत्येक डेपो मध्ये सुस्थितीत गाड्या किती? नादुरुस्त किती ? स्क्रप गाड्या किती ? याची श्वेत पत्रीका परिवाहन मंडळाने जाहीर करावी अशी ही मागणी जाधव यानी केली आहे .
(प्रसिद्धी साठी ) 28 / फेब्रवारी 2025 .
Discussion about this post