उदगीर /कमलाकर मुळे: किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्यावर्धिनी हायस्कूल मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक ,अध्यक्ष राम ढगे ,पर्यवेक्षक राजेंद्र कुमार व लाकडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप हनुमंते ,डी .के .जाधव बिरादार मॅडम यांची यावेळी उपस्थिती होती .या कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कुसुमाग्रज यांच्या साहित्य जीवनाची ओळख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विद्यालयातील मराठीचे शिक्षक एस. एस. घटकार यांनी आपल्या मनोगतातून सांगितले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर जमील अत्तार यांनी केले .आभार अविनाश पोशेट्टी यांनी मानले . विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
Discussion about this post