प्रतिनिधी:- शरद साळवे (9975582984)
भोकरदन तालुक्यातील मौजे तडेगाव हद्दीत पूर्णा नदीपत्रातुन अवैधरित्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे वाळू चोरटे भर दिवसा हजारो ब्रास चे ठिये मारून वाळू चोरी करीत आहे तडेगाव येथील गावाच्या संलग्न असलेले संत रोहिदास सेवाभावी संस्थेच्या नियोजित जागेच्या शेजारी मोठ्या प्रमाणात वाळू साठा तयार करून वाळू चोरी केली जात आहे वाळुचे ट्रॅक्टर तडेगांव गावातील गल्लीबोळातून फिरत असल्याने लहान मुले व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.तरी या प्रकरणी सबंधित महसूल विभागाने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी. अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे.तरी या प्रकरणी संबंधित अधिकारी काय कारवाई करणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.
Discussion about this post