सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी
वैजापूर तालुक्यात पाणी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कप स्पर्धा चालू आहे. या सर्व शेतकरी गटाचा स्नेह मेळावा शिऊर येथे संत शिवाई माता मंदिर येथे आज मोठ्या आनंदाने पार पाडला.
या स्नेह मेळाव्यास संभाजीनगरचे व बुलढाणा जिल्हा समन्वयक प्रल्हाद अरसूळ, खुलताबाद तालुक्याचे तालुका समन्वयक ज्ञानेश्वर इधाटे, खुलताबाद तालुक्याचे ट्रेनर नित्तल मॅडम, वैजापूर तालुक्याचे समन्वयक गणेश सूर्यवंशी, ट्रेनर प्रियंका करपे व बाळू चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
बळ्हेगाव येथील साई शेतकरी गट, जिजाऊ महिला शेतकरी गट व शंभूराजे शेतकरी गट, चिकटगाव येथील बळीराजा शेतकरी गट, मनोली येथील जय योगेश्वर शेतकरी गट, पेंडेफळ येथील प्रगतशील महिला शेतकरी गट,लाख खंडाळा येथील जय मल्हार शेतकरी गट, भटाणा येथील सई बाई महिला शेतकरी गट, वळण येथील जय जिजाऊ महिला शेतकरी गट, रघुनाथपूरवाडी येथील युवा स्मार्ट शेतकरी गट, भिवगाव येथील साई महिला शेतकरी, मनोली येथील जय योगेश्वर शेतकरी गट आणि नालेगाव येथील एकता महिला शेतकरी गट या गटांनी या स्नेह मेळाव्यात महत्त्वाचा सहभाग नोंदवला .
वरील सर्व गटांनी स्पर्धेतील आपला शेतीतील आलेला अनुभव, सुख दुःख, यश अपयश, गोड कडू प्रसंग सांगून एकमेकांच्या विचारांची देवाण घेवाण केली. कमी खर्चात जास्त उत्पन्न ते पण जैविक पद्धतीने व शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाने कसे करता येईल याचे पण चर्चा झाली.
कार्यक्रमाचे सांगता समूह भोजन करून झाली.
Discussion about this post