उदगीर /कमलाकर मुळे :श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुण्या म्हणून साहित्यिका अश्विनी निवर्गी ,प्राध्यापक सीमा मेत्रे पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के ,विभाग प्रमुख विलास शिंदे, एनसीसी प्रमुख बालाजी मस्कावाड प्रल्हाद देवरीकर हे उपस्थित होते .सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी, नाटककार ,समीक्षक कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अश्विनी निवर्गी आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या ,कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो ,अमृता पेक्षाही जास्त गोडवा व माधुरी या मराठी भाषेत आहे मराठी भाषेतील अक्षरांमध्ये असा गोडवा असेल की जे अमृतालाही आपल्या कमीपणाची जाणीव करून देईल संतांनी मराठी भाषेला समृद्धी प्राप्त करून दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा अल्प परिचय एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड यांनी करून दिला.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले ,विद्यार्थ्यांनी कथा कविता कादंबरी यांचे वाचन करावे वाचनामुळे आपल्याला ज्ञानात भर पडते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद एवढरी कर यांनी केले. तर आभार प्रर्यवेक्षक अरविंद सोनटक्के यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षण निदेशक सुधीर गायकवाड ,उज्वला वडले, शिवकुमार कोळे, सुनील महेंद्रकर, विनायक करेवाड उमाकांत नादरगे, सतीश जगताप, मारुती मारकवाड यांनी सहकार्य केले.
Discussion about this post