प्रतिनिधी:- जगन्नाथ क्षीरसागर
कंधार तालुक्यातील धाकटे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणारे श्री.क्षेत्र उमरज येथील प्राचीन श्री. संत नामदेव महाराज संस्थान मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त 108 कुंडी विष्णूयाग यज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित दादा पवार यांनी श्री संत नामदेव महाराज समाधी व विठ्ठल रुक्माई चे दर्शन घेतले.
यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री मा. श्री.अजित दादा पवार यांनी मराठवाड्यातील संत परंपरेचा गौरव केला. मराठवाड्याची भूमी संतांची, कलावंतांची, शूरांची व विरांची असून मराठवाड्याला संघर्षाशिवाय सहजासहजी काही मिळाले नाही. मात्र संतांच्या शिकवणीतून संघर्षशीलता व संयम हे गुण या ठिकाणच्या मातीमध्ये आले आहे. संतांच्या शिकवणीतून सर्वधर्मसमभावाचा मंत्र बुलंद व्हावा. या ठिकाणचा आध्यात्मिक सोहळा सामाजिक एकोप्याची नांदी ठरावी, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथा प्रवक्ते देवकीनंदन जी ठाकूर महाराज, श्री संत नामदेव महाराज संस्थान उंबरजचे श्री. संत महंत एकनाथ नामदेव महाराज, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Discussion about this post