सातारा (अनिलकुमार कदम प्रतिनिधी)
फलटण तालुक्यातील हक्काचे पाणी कोणालाही दिले जाणार नाही.असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे येथील नीरा उजवा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सांगितले आहे.फलटण तालुक्यातील पाणी नेहमी मिळते तेवढ मिळणार आहे.शासन व मंत्री यांच्या बद्दल गैरसमज जनतेत होवू नये यासाठी अधिकारी यांनी फलटण तालुक्यातील दिलेल्या पाण्याची आकडेवारी जाहीर करावी.राजकीय फायद्यासाठी कोणीही जनतेमध्ये गैरसमज पसरवू नये.असे परखड मत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
सन १०१९ पासून फलटण तालुक्याला मिळत असलेली पाण्याची आवर्तन सुरू राहावीत व फलटण तालुक्यातील हक्काचे पाणी तालुक्यातील शेतीसाठी मिळावे अशी जोरदार मागणी आमदार सचिन पाटील यांनी पुणे येथील नीरा उजवा कालवा सल्लागार समिती मध्ये केली तसेच फलटण तालुक्यासाठी किती पाणी मिळते ते संबंधीत अधिकारी यांनी जाहीर करावे म्हणजे जनतेमध्ये गैरसमज राहणार नाही.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी फलटण तालुक्यातील शेतकरी व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले.शासनाची व जलसंपदा मंत्री यांच्या भूमिकेचे कौतुक केले.
Discussion about this post