अविनाश जाधव यांची श्री राम सेनेच्या अध्यक्ष पदी निवड झाली – उत्सवाला भव्य स्वरूप
शिरूर श्री राम सेना आयोजित भव्य शिवजयंती उत्सव २०२५ साठी जय्यत तयारी सुरू झाली असून, तिथीनुसार १७ मार्च रोजी शिवभक्तांसाठी हा ऐतिहासिक सोहळा साजरा केला जाणार आहे.
या गौरवशाली क्षणी श्री. अविनाश जाधव यांची श्री राम सेना अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
शिवजयंती महोत्सव भव्य स्वरूपात साजरा होणार!
या वर्षीचा शिवजयंती उत्सव अधिक भव्य, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्वरूपात साजरा केला जाणार आहे. संपूर्ण शिरूर नगरी भगव्या झेंड्यांनी नटणार असून, शिवरायांच्या गगनभेदी जयघोषाने अवघे शहर दणाणून जाईल.
संस्थापक अध्यक्ष सुनिलदादा जाधव यांचा पुढाकार
श्री राम सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सुनिलदादा जाधव यांनी श्री. अविनाश जाधव यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करताना सांगितले की
“यंदाची शिवजयंती ऐतिहासिक आणि संस्मरणीय करण्यासाठी श्री राम सेना पूर्ण ताकदीने कार्यरत आहे. शिवभक्तांच्या एकजुटीने हा सोहळा अजरामर केला जाईल.” शिवप्रेमींना उत्सवात सहभागी होण्याचे आवाहनश्री राम सेना आणि संपूर्ण शिवप्रेमी जनतेच्या वतीने सर्वांना या भव्य सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा सोहळा छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा, इतिहास जपणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा असेल.
Discussion about this post