
कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे – रूपाली चाकणकर..
मुंबई वृत्तसंस्था…
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणावर आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही कठोर भूमिका घेतली आहे. जळगावमधील मुक्ताई यात्रेत यांच्या मुलीसह अन्य काही मुलींची टवाळखोरांनी छेड काढली. ही घटना उघड होताच विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
या घटनेवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही कठोर भूमिका घेतली आहे. त्या म्हणाल्या, “या प्रकरणाकडे मी स्वतः लक्ष देत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. या टवाळखोरांवर कठोर कारवाई केली जाईल. ही विकृती समाजातून नष्ट झाली पाहिजे. यापूर्वी त्या टवाळ खोरवर गुन्हा दाखल आहे. या गुन्हेगारांचे चेहरे लोकांसमोर आणले पाहिजेत. केवळ काळे कपडे घालून निषेध करण्यापेक्षा, त्यांना कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे.”
Discussion about this post