राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी धोरणाचा एक भाग म्हणजे १०० दिवस गतिमान शासन धोरण सध्या संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या उत्साहात सुरु आहे. मिरज तालुक्यातील मिरज मंडळ कार्यलयामध्ये आज एका विशेष शिबिराचे आयोजन मंडळ अधिकारी अमोल सानप त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केले. प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांच्या आदेशानुसार आणि तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांच्या संकल्पनेनुसार हा एक आगळा वेगळा उपक्रम मंडळ अधिकारी अमोल सानप यांनी आयोजित केला यामध्ये मिरज मंडळ परिघातील काही प्रलंबित लाभार्थ्यांना या शिबिराचा चांगला लाभ झाल्याचे मनोगत लाभार्थी मंडळींनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले या शिबिरामध्ये सर्वसाधारणपणे लक्ष्मी मुक्ती योजनेचे अर्ज स्वीकृती आणि नोंदणी ची सोय तसेच, प्रलंबित फेरफार निर्गती आणि निकाल प्रत वाटप, महसूल विभाग अंतर्गत प्रकरणांचा निपटारा करणे, ऍग्रीस्टॅक अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना ओळख पत्र देणे, मुख्यतः पाणंद रस्ते खुले करणे, संजय गांधी योजनेतील नवीन लाभार्थी योजनेतील नोंदणी व योजनेच्या प्रसिद्धी तसेच नवीन लाभार्थी यादी व यादीचे वाचन करणे, मयत खातेदारांच्या नोंदी साठी चावडी वाचन कार्यक्रम, विविध दाखल्याचे वाटप, नवीन मतदार नोंदणी आदी सर्व प्रकारच्या आदी सर्व प्रकारच्या विविध शासन उपक्रमांची माहिती नागरिकांना मंडळ अधिकारी अमोल सानप तसेच तलाठी मेजर जाधव यांच्या सह मंडळ अधिकारी कार्यालय तसेच तलाठी कार्यलयातील अन्य तलाठी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून माहिती दिली आणि वरील प्रमाणे प्रलंबित काही प्रकरणे मार्गीही लावली आजच्या या शिबिराबाबत तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांनी समाधान व्यक्त केले आहे.आज या शिबिरासाठी बहुसंख्य नागरिक आणि लाभार्थी उपस्थित होते
Discussion about this post