:- अरविंद रेवतकर मित्रपरिवार भिसी
:- ( समीर बल्की तालुका प्रतिनिधी भिसी )
चिमूर तालुक्यातील भिसी ही नगरपंचायत सध्या समस्यांच्या विळख्यात सापडली असून गावातील अनेक समस्यांमुळे गावकरी त्रस्त झाले आहे. यामुळे येथील गावातील समस्या तत्काळ दुर कराव्या अशा मागणीचे निवेदन ,मुख्याधिकारी साहेब, नगरपंचायत कार्यालय भिसी देण्यात आले आहे. नगरपंचायत येथील समस्याचे तात्काळ निराकरण करण्याबाबत दिले निवेदन :- अरविंदभाऊ रेवतकर मित्रपरिवार भिसी :- मा. मुख्याधिकारी साहेब, नगर पंचायत कार्यालय भिसी
चिमुर तालुक्यातील भिसी नगरपंचायतमध्ये अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत त्यामुळे भिसीवासीय जनतेच्या अनेक समस्यांचे निराकरण आपणाकडून करण्यात यावे.
. 1) भिसी गावां अंतर्गत होत असलेल्या रोडचे बांधकाम करण्याआधी रोड रुंदीकरण करून नव्याने बांधकाम करण्यात यावे.
2) रोड रुंदीकरण करीत असताना जे रोडवर अनधिकृत अतिक्रमण करून व्यवसाय करीत आहेत त्यांना पर्यायी उपलब्ध करून द्यावी तसेच ज्यांच्या मालकीची जागा रोड करिता अधिग्रहित करायची आहे त्यांना शासकीय नियमानुसार बाजार भाव प्रमाणे मोबदला देण्यात यावा.
3) भिसी नगरपंचायत मध्ये होत असलेल्या बोगस नौकर भरतीला आळा घालण्यात यावा.4) भिसी वार्ड क्र. ३ (जुनी भिसी) मध्ये पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात यावी.5) नाल्या सफाई न झाल्यामुळे ठेकेदाराचे देय्यके थांबवून ठेकेदारावर प्रशासकीय व फौजदारी
गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी.
6) डेंगू आजाराची साथ चालू असल्याने आपल्या गावात खुल्या जागेत फवारणी सुरु आहे त्याच प्रमाणे गावात घरोघरी जाऊन फवारणी व नाल्या सफाई करण्यात यावी. 7 ) गावातील बोरवेल वरील पाण्याच्या टाकी (सिंटेस) साफ करण्यात याव्या.
8) बोरवेल वरील लावलेल्या पाण्याच्या टाकी (सिंटेस) चे मचाण (Stand) जीर्ण झाल्याने
नव्याने बसविण्यात यावे.
9) स्ट्रीट लाईट पोल वरील लाईट लावण्यात यावे.
10) पोलीस स्टेशन समोरील खाली जागेतील अंगणवाडीच्या बाजूस असलेले पोल व
गाड्या हटवून तेथील अतिक्रमण तथा बाथरूम (मुतारी) हटवून त्या जागेचे सोन्दर्याकरण करून तेथील गंदगी कायमस्वरूपी नष्ट करावी.
11) धनगर मोहल्ला चौक येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे पुतळ्या जवळील अतिक्रमण हटवून सोन्दर्याकरण करण्यात यावे.१२) जुनी ग्रामपंचायत चौक ते भट्टी चौक दरम्यान दोन्ही बाजूच्या खोल असलेल्या नाल्यांवर झाकण लावून वरून बंद करण्यात याव्या.
१३) गावामध्ये उघड्यावर असलेले मटन, चिकन व मच्ची मार्केट गावाबाहेर पर्यावी जागेवर व्यवस्था करण्यात यावी.
१४) गावातील दलित वस्तीला लागून असलेले देशी विदेशी दारूचे दुकान गावाबाहेर नेण्यात यावे.
१५) बाजार चौक येथील लागत असलेले हात ठेलेवाल्यांना रोड वरून हटवून पर्यायी जागा देण्यात यावी,
१६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा महात्मा गांधी यांचे पुतळ्याचे बाजूला लागत असलेल्या ठेले (दुकाने) व पार्किंग गाड्याना तिथे पार्किंग करू न देता नो पार्किंग झोन घोषित करणे
१७) स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालयास वाढीव अनुदान मिळण्यात यावे व गावात ज्यांचे कडे शौचालय नाही त्यांना शौचालय बांधून द्यावे.
१८) PM आवास योजने अंतर्गत किती घरकुल मंजूर झाले याची लिस्ट नगर पंचायत ने जनतेला उपलब्ध करून देण्यात यावी.
१९) वादळी पावसाने ज्यांच्या घराचे नुकसान झाले किवा नुकसान होण्याच्या स्थितीत असतील त्यांना तत्काळ घरकुल मंजूर करण्यात यावे.
२०) अपंग कल्याण अंतर्गत अपंगाचे अनुदान तथा शासकीय योजनेचा लाभ अपंगा पर्यंत लवकरात लवकर पोहचवण्यात यावा.
अश्या प्रमुख
समस्यांचे भिसी नगर पंचायतचे प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सदर समस्यांचे निराकरण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुध्दा देण्यात आला. या प्रसंगी उपस्थित शिवसेना प्रमुख भाऊरावजी ठोंबरे ललीत भाऊ डुकरे, देवा भाऊ घुटके, जगत तांबे, अक्षय खवसे, जग्गा भाऊ मेश्राम, चेतन पडोळे, अक्षय नागपुरे, रोशन रेवतकर, सौरभ कामडी व मित्र परिवार उपस्थित होता..
Discussion about this post