प्रशांत पाटील / अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी – कोपरगांव औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना नियीमत व पुरेशा प्रमाणांत वीज पुरवठा होत नाही म्हणून अनेक वर्षे पाठपुरावा करून नव्यांने पाच एम व्ही ए क्षमतेचे दोन वीज रोहित्र बसविण्यांत आले पण त्यातुन अन्यत्र वीजपुरवठा केला जाणार असल्याने येथील उद्योजकांचे कोटयावधीचे नुकसान होणार आहे तेंव्हा कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे फिडरमधुन अन्यत्र वीज देवु नये अशी मागणी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवानेते विवेक कोल्हे यांनी एका पत्राद्वारे केली आहे.
कोपरगाव औद्योगिक वसाहतीच्या वीजेच्या समस्येसाठी वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना पाठविलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, सध्या वीज वितरण कंपनीने कोपरगांव औद्योगिक वसाहतीच्या फिडरमधुन कोपरगांव बस स्टँडला वीज पुरवठा करण्यासाठी वीज तारांचे काम सुरू केले आहे.कोपरगांव औद्योगिक वसाहतीच्या उद्योजकांना सतत खंडीत होणा-या वीजेच्या त्रासातुन वाचविण्यांसाठी शासनस्तरावर तसेच वीज वितरण कंपनीकडे सातत्यांने पाठपुरावा करत नव्याने ५ एमव्हीए क्षमतेचे दोन नविन वीज रोहित्र कोपरगांव औद्योगिक वसाहतीत सुरू करण्यांत आले त्यामुळे येथील उद्योजकांचे नुकसान टळले आहे.
औद्योगिक वसाहतीत अलिकडे नव्याने काही उद्योग सुरू झाले आहेत. त्यांना यातून वीजपुरवठा होण्यासाठी वीज वितरण कंपनीने कोपरगांव बस स्टँडला वीजपुरवठा करण्यासाठी नव्याने वीज लाईन टाकण्याचे काम हाती घेतले आहे ते उद्योजकांवर अन्याय ठरणार आहे. असे झाल्यास येथील औद्योगिक उत्पादनात घट होवुन त्याचा फटका व्यावसायिकांना बसणार आहे तेंव्हा वीज वितरण कंपनीने सदगुरू गंगागिर महाराज महाविद्यालयासमोरील १३२ केव्ही वीज सबस्टेशनमधुन कोपरगांव बस स्टँडला वीज द्यावी म्हणजे कोपरगांव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांवर ओढवणारे वीजेचे संकट दूर होईल असे त्यांनी शेवटी म्हटले आहे.
वीज खंडित झाल्यानंतर उद्योजकांना होणारे नुकसान हे दुर्देवी असते. अन्यत्र वीजपुरवठा झाल्याने अनेकदा तुटवडा होऊन उद्योग अडचणी येण्याची स्थिती असते. या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून समस्यांचे तातडीनेने निवारण करण्यासाठी कार्यवाही होण्याची अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे.
Discussion about this post