
भरत पुंजारा,
ग्रामीण प्रतिनिधी पालघर..
बऱ्हाणपूर ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित बऱ्हाणपूर क्रिकेट लीग २०२५ ला मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. ही रोमांचक क्रिकेट स्पर्धा बऱ्हाणपूर गावठाण पाडा येथे ७, ८ आणि ९ मार्च रोजी रंगणार आहे. स्पर्धेत एकूण बारा संघ सहभागी झाले असून, गतवर्षीप्रमाणे यंदाही क्रिकेटप्रेमींना उत्कृष्ट खेळाचा आनंद लुटता येणार आहे.
या स्पर्धेत उर्वशी, कल्याणी इलेव्हन, स्व. दामोदर स्मृती, दुमाडा योद्धा, लोचन स्मृती, अज्जु टायटन्स, निशांत इलेव्हन, शिवाई वॉरियर्स, प्रभास पिंक पँथर्स, ए.जे. फायटर्स, स्वराज्य वॉरियर्स आणि यशदा वॉरियर्स हे संघ सहभागी झाले आहेत. मागील हंगामात या सर्व संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यामुळे यंदाही उत्कंठा वाढली असून, खेळाडूंकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी अध्यक्ष निलेश पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील आणि विश्वस्त दता वझे, हेमंत वेडगा, अशोक वरठा, प्रशांत तांबडा यांच्यासह इतर सदस्यांनी अथक मेहनत घेतली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच ही क्रिकेट स्पर्धा भव्य स्वरूपात साकारत आहे.
बऱ्हाणपूर क्रिकेट लीग २०२५ स्पर्धेमुळे तरुण खेळाडूंना आपली कौशल्ये दाखवण्याची संधी मिळणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी ही एक पर्वणी असणार असून, येत्या तीन दिवसांत रंगणाऱ्या या रोमांचक सामन्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे..
Discussion about this post