गणेश राठोड
प्रतिनिधी / ६ मार्च
उमरखेड –
महाराष्ट्र राज्य ग्रामीण महिला ग्रामीण महिला जीवनोन्नती (उमेद ) अभियानांतर्गत मुळावा प्रभाग समन्वयक म्हणून महिला सक्षमीकरणासाठी सहा वर्षापासून सातत्याने तनमनाने कार्य करीत असताना पिंपळदरी येथील महिलेच्या माध्यमातून माझ्यावर मागील सहा महिन्यापासून बिन बुडाचे आरोप करून माझे मानसिक खच्चीकरण करून उपद्रव दिल्या जात आहे . माझ्यावर केलेल्या आरोपांची वरिष्ठांनी सखोल चौकशी करून मला न्याय द्यावा , अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद ) च्या मुळावा प्रभाग समन्वयक माधुरी दळवी यांनी विश्रामगृह येथे बोलाविलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे .
पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्यावर केलेल्या बिन बुडाच्या तक्रारींचा पाढा वाचला मागील ६ वर्षापासून महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ४ हजार १०० महिला असलेल्या मुळावा प्रभागात कार्य करीत असताना तेथे कोरोना काळात पिंपळदरी येथे दोन वर्षाचा खंड पडल्यानंतर पारदर्शकपणे महिला सक्षमीकरणाच्या योजना राबवून महिलांना लाभ दिला त्यात कुठल्याही प्रकारची अफरातफर झालेली नाही प्रभागातील प्रत्येक ग्राम संघाच्या समूहाला १५ हजार रुपये प्रमाणे दोन टप्प्यात फिरता निधी वाटप केला .
पिंपळदरी ग्राम संघांच्या माध्यमातून पर लाख ४० हजार रुपयाचे वाटप केले प्रत्येक समूहाला साठ हजार रुपये कर्ज वाटप करून त्याची परतफेड सुद्धा झाली महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन केले त्याचबरोबर मानव विकास यंत्रणे अंतर्गत तालुक्यातील नऊ गावांमध्ये शेळीपालन गोठा बांधकाम यासाठीयोजना राबविण्यात आली कार्यरत प्रभागातील पिंपळदरी येथे आदिवासी समाजातील समूहाला शेळीपालन योजना दिली
त्यात ३२० रुपये किलो प्रमाणे प्रत्येक शेळीची किंमत ठरलेली असल्यामुळे व खरेदी केलेल्या शेळ्यांची किंमत वाढल्याने शासनाच्या उपलब्ध निधीप्रमाणे शेळ्या व बोकड सदर महिलांना खरेदी करता आल्या नाही शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीच्या वर रक्कम लागत असल्याने महिलांनी त्यांच्या इच्छेनुसार जळगाव येथील गोल्डी फार्म कंपनीच्या माध्यमातून शेळ्या व बोकड खरेदी केल्या संबंधित कंपनीकडे रीतसर रक्कम जमा झाली महिलांच्या इच्छेनुसार हा खरेदी व्यवहार पूर्ण झाला असून आपणाकडून कुणाचीही फसवणूक करण्यात आली नाही परंतु कडबा कटर खरेदी अशाच पद्धतीने पारदर्शक करायचा मानस असताना तक्रारकर्त्या महिलेच्या पतीने मलाकडबा कुटी खरेदी न करता करताच रक्कम काढा असे म्हटल्यानंतर त्यास मी विरोध केला त्या नियमानुसार खरेदी केल्या जाईल असे त्यांना सांगितल्यामुळे त्यांनी चिडून माझ्या विरुद्ध पोफाळी पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा केली परंतु तक्रारी तथ्य नसल्याने पोलिसांनी ब फायनल पाठवून दिले त्यामुळे सत्याच्या पाठीमागे ईश्वर असल्यामुळेच माझी त्यातून सुटका झाली त्यानंतरही माझ्या मागे तक्रारींचा ससेमीरा सुरूच आहे .माझी प्रशासनाने महागाव येथे बदली केली आहे प्रशासनाचा आदेश मला सिरसावंध्य आहे असे सांगत त्यांनी माझ्याकडून कुणाचीही फसवणूक झालेली नसताना माझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठीच मला उपद्रव मूल्य दिले जात असल्याने,माझ्यावरील आरोपांच्या तक्रारींची निष्पक्षपणे चौकशी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोक्षमोक्ष लावावा व मला न्याय मिळवून द्यावा पत्रकार परिषदेत मुळावा प्रभाग समन्वयक माधुरी दळवी यांनी म्हटले आहे . पत्रकार परिषदेला सविता सूर्यवंशी , समूह साधन व्यक्ती,संगीता चव्हाण ,आरोग्य सचिव जयश्री कांबळे , आशा कबले,गिरीजा चंद्रवंशी ,बेबी कबले,सुजाता पाटील ,पूजा अमृते,जानकी पत्रे,आशा खंदारे,सोनाली सूर्यवंशी ,प्रभाग संघ पार्डी व्यवस्थापक पूजा चव्हाण आदींची उपस्थिती होती
Discussion about this post