अर्धापुर, प्रतिनिधी
तामसा परिसरातील तिर्थक्षेत्र पिंपळगाव येथील भव्य शिवमहापुराण कथेसाठी अर्धापूर शहरातील व तालुक्यातील शिवभक्तांच्या वतिने १०१ क्विंटल तांदूळ महाप्रसादासाठी पाठविण्यात आला आहे. तांदळाच्या ट्रकची पुजा करून तसेच चालकांचे स्वागत करून ट्रकला पाठविले आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू क-हाळे, ज्येष्ठ नेते धर्मराज देशमुख, नगरसेवक प्रवीण देशमुख, राजेश्वर शेटे, व्यंकटी राऊत, बाबुराव लंगडे, डॉ. विशाल लंगडे, दत्ता नवले, योगेश हाळदे, व्यंकटराव साखरे, पंडितराव लंगडे, ओमप्रकाश पत्रे, बाबनराव लोखंडे, गोपाल पंडित, बाळू माटे, गुरुराज रणखांब, सखाराम पवार, शिवाजी सोनटक्के, गंगाधर सोनटक्के, तुकाराम माटे, गोविंद भुतडा, आनंद मोरे आदी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post