मोहदा प्रतिनिधी :-विरेंद्र चव्हाण
मोहदा :-मोहदा येथील सरदार पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराचे उदघाटन पार पडले. या उदघाटन समारंभी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री. सचिनभाऊ चौहान उपस्थित होते. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा. श्री. विरेंद्रजी तोडकरी(संचालक कृ. उत्पन्न बा. समिती पांढऱकवडा )उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्ताविक रूपरेषा कार्यक्रम अधिकारी प्रा. वैभव सामृतवार यांनी केली. महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. स्नेहलता घाटे यांनी राष्ट्रीय सेवा योजने बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा काळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रविण शेंद्रे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा प्रा. पंकज आत्राम यांनी आखली. या उदघाटन समारंभी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे लिपिक बाळा गजबे परिश्रम घेत आहे
Discussion about this post