पाणी पुरवठा वेळेवर होत नसलेने आजऱ्यात ११ मार्चला मोर्चा
आजरा: प्रतिनिधी,
आजरा शहर व उपनगरात नियमित पाणी पुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीच्या पुढाकाराने सर्व राजकीय पक्ष व संघटना यांच्या वतीने आजऱ्यात ११ मार्चला महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
शहर व उपनगराला स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने अनेकवेळा आजरा नगरपंचायतीकडे पाठपुरावा केला आहे.१ जानेवारी रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते त्यावेळी येत्या पंधरा दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते.यानंतर पुन्हा समितीने मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या करत शंखध्वनी आंदोलन केले होते यावेळीही नवीन मोटर खरेदी करुन पाणी पुरवठा करु असे आश्वासन दिले.आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती वारंवार याबाबत पाठपुरावा करत असताना नगरपंचायतीने मात्र कागद नाचवत समिती व जनतेची दिशाभूल केली आहे.
दुषित पाण्यामुळे रोगराई पसरली आहे.जनतेचा उद्रेक झाला आहे.याचा निषेध म्हणून येत्या ११ मार्चला नगरपंचायतीवर महामोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन समितीने नगरपंचायत, पोलिस स्टेशन व तहसिलदार कार्यालयात दिले आहे.
निवेदनावर विजय थोरवत (शिवसेना शहर प्रमुख) , सुधीर देसाई (संचालक के. डी.सी.सी बँक )मुकुंद देसाई (राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष),कॉ. संपत देसाई (प्रदेश अध्यक्ष ),परशुराम बामणे (अध्यक्ष अन्याय निवारण समिती )उदय पवार (माजी सभापती पंचायत समिती आजरा )व पांडुरंग सावरतकर, गौरव देशपांडे , ज्योतिबा आजगेकर, दिनकर जाधव,मिनीन डिसोजा, बडोपंत चव्हाण ,वाय बी चव्हाण, अमित सामंत, विक्रम सिंग देसाई , रशीद पठाण ( माजी पंचायत समिती सदस्य )संतोष डोंगरे यांच्या सह्या आहेत.
Discussion about this post