शिरोळ तालुका प्रतिनिधी/ तात्यासाहेब शिरगावे
टाकळीवाडी : ५४ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधुन राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्य श्री गुरुदत्त शुगर्स येथे विविध उपक्रमांनी सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. कारखान्याचे अधिकारी अतुल पवार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सेफ्टी ऑफिसर श्री असदुद्दीन काझी यांनी सर्वांना सुरक्षिततेची शपथ दिली.यावेळी मार्गदर्शन करताना श्री. पवार म्हणाले, सर्व कामगार व अधिकारी यांनी कारखान्यात काम करीत असताना अपघात होऊ नये यासाठी हेल्मेट, सेफ्टी बुट यासह सर्व सेफ्टी साधनाचा वापर करावा. कर्मचारी यांनी सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करून विना अपघात काम केल्यास कामगारांची, कारखान्यांची तसेच राष्ट्राची प्रगती होते. तसेच कामगारांनी दिलेल्या नियमावली प्रमाणे व सुरक्षा साहित्याचा वापर केल्यास अपघात रोखण्यासाठी मदत होते असे श्री. पाटील यांनी सांगितले. सुरक्षा सप्ताह निमित्त कामगारांमध्ये सेफ्टी निबंध, कविता, स्लोगन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते .
Discussion about this post