गंगा चंद्र साहित्य कला सेवा मंच घाटकरवाडी तर्फे राज्यस्तरीय काव्य स्पर्धा 2025 आयोजन…..
घाटकरवाडी येथील मंचाच्या वतीने, राज्यस्तरीय काव्य पुरस्कार 2025 चे आयोजन करण्यात आलेले आहे .. सन्मान चिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे
यामध्ये तीन पुरस्कार असून
*श्रीहरी काव्य पुरस्कार… सर्वांसाठी
*जिजाई काव्य पुरस्कार…फक्त महिलांसाठी
*सुवर्ण साक्षी काव्य पुरस्कार पहिल्या काव्यसंग्रहासाठी…
2024 मध्ये प्रकाशित झालेली पुस्तके यासाठी पात्र असतील…
एका स्पर्धकाला एकाच विभागात सहभागी होता येईल… वरील पैकी एक विभाग नमूद करावा
पुस्तकं पाठवण्याची अंतिम दिनांक 15 एप्रिल 2025 असेल..
विजेत्यांना निकाल कळविण्यात येईल… मे महिन्यामध्ये पुरस्कार वितरण सोहळा घेण्याचे नियोजित आहे… तरी
पुस्तकाचे एक प्रत, कवीची संक्षिप्त माहिती फोटोसह, स्वयं घोषणा पत्रासह, केवळ पोस्टानेच
प्रति,
श्री दत्तात्रय हरी पाटील
रा घाटकरवाडी पो. किटवडे
ता. आजरा जि. कोल्हापूर
पिन. 416505..
वरील पत्त्यावर
पाठविण्याचे आव्हान, मंचाच्या सचिव सौ.वैष्णवी दत्तात्रय पाटील
यांनी केले आहे..
Discussion about this post