संपूर्ण वस्ती जळून खाक,सर्व कुटुंब उघड्यावर**अमरावति/मेळघाट(अशोक वस्ताणि)*अमरावती जिल्हयातिल मेळघाटा चे धारणी तालुक्यातील चाकर्दा येथे ४ मार्च मंगळवार रात्री ९ वाजता मोठी अग्नि तांडवाचि घटना घडली.
या आगीत एका रेंजमधील ७ हून अधिक घरे पूर्णपणे जळून खाक झाली, तर इतर २ घरांचेही मोठे नुकसान झाले. आग इतकी भीषण होती की काही क्षणातच संपूर्ण वस्ती आगीच्या ज्वालांनी वेढली गेली. बरेच नागरिक घरी नव्हते, त्यामुळे जीवितहानी टळली, परंतु त्यांचे संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाले.
या भीषण आगीत घरातील भांडी, गॅस सिलेंडर, कपडे,दुचाकी, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि शेतातून आणलेली तूरही जळून खाक झाली. कठोर परिश्रमाने बांधलेली घरे एका रात्रीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, ज्यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली.
घटनेच्या वेळी अनेक घरमालक कामानिमित्त बाहेर होते, त्यामुळे जीवितहानी टळली. पण जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांना त्यांची घरे राखेत रूपांतरित झालेली दिसली.
या अपघातानंतर स्थानिक प्रशासन आणि गृहनिर्माण विभागाने तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
घरकुल योजना, कामगार कल्याण योजनेअंतर्गत मदत मिळावी, तसेच घरगुती वस्तूंची तात्काळ तरतूद करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.सरकारी मदतीबरोबरच सामान्य नागरिक, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांकडूनही मदतीचे आवाहन केले जात आहे.
प्रशासनाने जलद पंचनामा करून बाधितांना तात्काळ आर्थिक मदत, तात्काळ मदत आणि अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
Discussion about this post