
या घटनेचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी प्रशांत सोनवणे यांनी पाहूया..
सविस्तर माहिती अशी की,
अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात गुरुवार दिनांक 6 मार्च 2025 प रोजी पाथर्डी नगरपालिका हद्दीत..
आठवडा बाजारात रस्त्यावर बसणाऱ्या बाजूला करून हटवताना राग आल्याने शिवप्रसाद बेळगे व पांडुरंग सुरेश भवरे याने पालिकेच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला.याबाबत पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यावी असे पत्र पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी पोलीस निरीक्षकांना दिले आहे. संबंधितावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही कामावर हजर होणार नाहीत असा इशारा पालिकेच्या स्वच्छता कामगारांनी दिला आहे. नगरपालिकेतील कर्मचारी आठवडा बाजारात बुधवारी रस्त्यावर बसणाऱ्या शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना वाहतुकीस अडथळा ठरू नये म्हणून सांगत असतात. त्याचा राग येऊन शिवप्रसाद बेळगे यांनी दिनकर यांना करून सरकारी कामात अडथळा आणला याबाबत पोलीस तक्रार घ्यायला तयार नाहीत असे पालिका कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.पालिकेचे मुख्यधिकारी संतोष लांडगे यांनी याबाबत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना पत्र देऊन गुन्हा दाखल करून घेण्याची विनंती केली आहे. गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही स्वच्छता कामगार कामावर हजर होणार नाहीत असा इशारा पालिकेतील कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांना लिखित निवेदनातून दिला आहे. कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळत नसेल तर काम कसे करणार असा प्रश्न कामगारांनी उपस्थित कर्मचाऱ्यांनी केला आहे. कामगारांना कोणी वाली राहिले नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली. कामावर बहिष्कार टाकण्याच्या निवेदनावर 22 स्वच्छता कामगारांच्या सह्या आहेत..
Discussion about this post