
वरोरा तालुका प्रतिनिधी :- उमेश कोटकर
वरोरा :
दिनांक १० मार्च रोज सोमवारला शेतकऱ्यांच्या विविध मांगण्या घेऊन वरोरा येथील डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम चौकात (रत्नमाला चौकात) राष्ट्रीय महामार्ग रोखून धरणार असे शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी प्रशासनास एका पत्रा द्वारे कळवले होते. त्या पत्रा अनुषंगाने दिनांक ५/३/२०२५ ला पोलीस निरीक्षक वरोरा यांच्यामार्फत शेतकरी शिष्टमंडळाची बैठक लावण्यात आली होती. या बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाकडून शेतकरी शिष्टमंडळाला कळविण्यात आले कि, आमच्या वतीने सर्व विभागाणा पत्र व्यवहार केलेला आहे त्यामुळे तुम्ही हे आंदोलन थांबवावे, तसेच दिनांक ७/३/२०२५ ला निवेदनातील विषयावर संबंधित विभागातील अधिकारी यांना बोलावून तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी शिस्त मंडळाची आढावा बैठक लावण्यात आली मात्र संबंधित विभाग यांच्या कडून शेतकरी शिष्टमंडळ यांना असे कळविण्यात आले कि निवेदनातील सर्व विषय हे कॅबिनेट मंत्री चे असल्यामुळे संबंधित विषयावर आम्ही तोडगा काढू शकत नाही. असे संबंधित विभागाकडून शिष्टमंडळाला सांगण्यात आले त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळाने घेतली यावर प्रशासन काय करणार आहे. या कडे आता सगड्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
या आढावा बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सचिव चंद्रसिंग शिंदे, तालुका कृषी विभागाकडून डोईफोडे मॅडम, वीज वितरण कंपनीकडून उपविभागीय अभियंता बदकल, तर सहाय्यक उपनिबंध म्हणून दिवसे तर शेतकरी शिष्ट मंडळ म्हणून शेतकरी नेते किशोर डुकरे, शेतकरी तुकाराम निब्रड, मनोज काळे, तुलसी आलम, अरविंद झाडे, यादी शेतकरी हजर होते..
Discussion about this post