
आपण अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहासाचा उलगडा केल्यास मानवांची मानवता,माणूस पण,स्वातंत्र्य,समता,बंधुभाव व न्याय प्रणाली सुस्थितीत होती.कारण सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्धांनी जगामध्ये स्त्रियांना दीक्षा देऊन महिलांचा सन्मान करुन स्वातंत्र्य दिले होते. ही गोष्ट मानवाच्या ऐतिहासिक जीवनातील लक्षणीय आहे.वात्सल्य (प्रेम)निर्माती,सर्वगुणसंपन्न ,शीलवान ,प्रगल्भ विचार,मानव सुधारक,सत्यवादी व पुरुषाबरोबर कार्य करणारी म्हणजे महिला माता आहे . आईच्या वात्सल्यातून निर्माण होणारी करुणा म्हणजे दया. स्त्री ही एक सृजनशील नवनिर्मिती निर्माण करणारी ,मानवाला जन्म घालणारी जननी म्हणजे आई आहे.संस्कार आणि मानवाची संगोपन करणारी नवनिर्मित विचारधारा निर्माण करून मानवाला संपूर्ण शिक्षण देणारी बालकाचे,संपूर्ण आयुष्यभर जीवन शिक्षण पूर्ण करणारी,स्वतःचे प्राण देऊन आपल्या बालकाचे रक्षण करणारी म्हणजे आई आहे..स्वतःहा कष्ट करून,उपाशी राहून वेळप्रसंगी संकट झेलून,सर्वांसाठी झटून,कुटुंबालाच नव्हे तर उपाशीपोटी असणाऱ्या मानवाला घास भरवणारी ही महिला म्हणजे आई असते.आईच्या जवळ समतेची ,स्वातंत्र्याची ,सुखकारक कौशल्य विचारधारा आहे .स्त्री आणि पुरुष या दोघांमधील शारीरिक रचना थोडीफार जरी वेगवेगळी असली तरी,दोघांमधील साम्य समानता मोठ्या प्रमाणात आढळून येते.पुरुष आणि स्त्री हे शरीर संबंधावरून एक दुसऱ्यावर अवलंबून असतात,म्हणून एक दुसऱ्याचा भेद करणे, द्वेष करणे योग्य नाही असे मला वाटते. महिला घरातील सर्वांची मर्जी संपादन करून जीवन जगत असते .सर्वांची सेवा करणे,मधुर भाषण करणे,घरातील सर्वांचा सांभाळ करणारी ही महिलाच असते.महिला ही मुलगी,पत्नी ,सून ,आई ,मामी, मावशी,काकी,आत्या,वआजी अशा अनेक भूमिका बजावून अनुभवाची खाण असते.अनेक संतांनी,विद्वानांनी ,महंतांनी ,समाज सुधारकांनी ,शुरविरांनी,विचारवंतांनी,साहित्यकांनी व महान व्यक्तींनी आपल्या आईचा सन्मान केलेला आहे .परंतु काही लोक याला अपवाद असतात .मनात विषमता,कटूता व द्वेष भावना असलेले व्यक्ती मातेचाच काय पण कोणत्याही महिला भगिनींचा सन्मान करू शकत नाही याचे मला खूप दुःख वाटते.माता महिला आई ही आपल्याला जन्म देते.विश्वात मान सन्मान आई-बाबा मुळेच मिळत असतो कारण आई-बाबा आपल्यावर चांगले संस्कार टाकतात..आई मौल्यवान विचारांची स्त्रोत व देणआहे .महिला ही सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करीत आहेत .राष्ट्र उभारणीत त्यांचे फार मोठे योगदान आहे.शिक्षक,डॉक्टर,नर्स,वकील ,अंतराळ ,अनुसंशोधन ,जिल्हाधिकारी ,आयपीएसअधिकारी ,सरकारी कार्यालय व राजकारण अशा अनेक क्षेत्रात महिला आपली क्षमता आणि कामगिरी दाखवून देत आहेत.म्हणूनच आपण महिलांचा सन्मान केला पाहिजे असे मला वाटते. आज आठ मार्च जागतिक महिला दिवस स्त्रियांच्या लढण्याचा अस्मितेचा दिवस ,सुवर्णमय अक्षराने लिहून स्मरणात ठेवण्याचा दिवस .स्त्रियातील भव्य आणि दिव्य वैचारिक निर्माण होण्याचा दिवस.स्त्रियातील कल्याणकारी विचारांचा भडका कोणीही विसरू किंवा विझवू शकत नाही कारण स्त्रियांच्या हक्कविषयी विचारांचा अग्नी भडका सर्व जगामध्ये पसरला होता .अमेरिका आणि युरोपमध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत स्त्रियांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला होता .या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या सोयीप्रमाणे संघर्ष करीत होत्या .अमेरिका या देशात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 1890 मध्ये हक्का संदर्भात द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन स्थापन करण्यात आली होती.यात स्त्रियांची मर्यादित हक्कांची मागणी व वर्णद्वेषी माणसे असल्या कारणामुळे बहुसंख्य काळ्या वरणाच्या आणि देशांतर्गत कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला होता.1907 मध्ये स्टुट गार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली होती .अतिशय लढाऊ बाणा असलेली क्लारा झेटकीन कम्युनिस्ट कार्यकर्तीने या परिषदेमध्ये सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करणे ,हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे अशी जाहीर घोषणा केली .1910 मध्ये कोपन हेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लारा झेटकीनने मांडला तो मान्य झाला.भारतात मुंबई येथे पहिला 8 मार्च 1943 ला महिला दिवस साजरा करण्यात आला.तसेच महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे 8 मार्च 1971 ला एक मोठा महिलांचा मोर्चा काढण्यात आला होता .पुढे 1975 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले .त्यानंतर महिलेच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या .आता सर्व क्षेत्रात 8 मार्च हा महिला दिवस साजरा केला जात आहे .महिला प्रति आदर व सन्मान करणारे आणि महिलांच्या समस्यांना अन्यायाला वाचा फोडणारे तथागत भगवान गौतम बुद्ध ,छत्रपती शिवाजी राजे,राजेर्षी शाहू महाराज,पेरीयार स्वामी,महात्मा ज्योतिराव फुले,सावित्रीबाई फुले,डॉक्टर भीमराव आंबेडकर व राजाराम मोहन राय आदी मान्यवरांनी ,संतांनी,थोर समाज सुधारकांनी विचारवंतांनी व विशेषता भारतातील न्याय व्यवस्थेनी न्याय मिळवून दिलेला आहे.भारतातील सर्व नागरिकांना (पुरुष ,स्त्री व तृतीयपंथी )यांना राज्यघटनेमध्ये अनुच्छेद एक ते 395 कलमे व 12 अनुसूची मध्ये विविध अधिकार दिलेले आहेत .मानवांची आचारसंहिता देण्यात आलेली आहे म्हणून लेखन करणारे लेखक यांची इच्छा आहे की घराघरात संविधान पोहोचले पाहिजे आणि रोज नियमितपणे संविधानाचे वाचन करून कायदेविषयक संपूर्ण जागृत होऊन सुखमय जीवन जगले पाहिजे.महिलांनी आपल्या घरात भारताची राज्यघटना ग्रंथ ठेवून स्वतः वाचन करून,घरातील इतरांना भारतीय संविधान वाचण्यास प्रवृत्त केले पाहिजे.महिलांनी कोणत्याही व्यक्तीचे गुलामगिरीचे विचार स्वीकारू नये.माता भगिनींने प्रत्येक गोष्टींची चाचपणी परीक्षा करून विचार स्वीकारले पाहिजेत.महिलांनी कोणत्याही विचारांचे गुलाम असता कामा नये.चिंतन ,मनन करून मानव हितकारक व स्वतःच्या विचारांचे अविष्कार शोध काढूनच विचारांचा स्वीकार करावा .जसा निसर्गाच्या सानिध्यात मानवाचा जन्म होतो तसा तो सर्व निसर्गदत्त हक्काचा हक्कदार असतो परंतु मानवाने स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी,अहंकार,संपत्ती,रुढी परंपरेमुळे स्त्रियांच्या गोरगरीब ,अज्ञानी लोकांचे निसर्गदत्त अधिकार व हक्क वर्चस्व असलेल्या प्रस्थापित गटाने,काही मानवाने हिसकावून घेतले .त्यांना विचारांचे गुलाम बनविले म्हणूनच प्रथमत: महान समाज सुधारक ,विद्वान ,मानवी कल्याणकारी विचार शिक्षणातून व अनुभवातून प्रत्यक्ष अनुभूती मिळवून तमाम मानवांना,महिला,गोरगरीब व अज्ञानी बंधू-भगिनींना गुलामगिरी विचारातून मुक्त करण्यासाठी अत्त दिपभव!म्हणजे (स्वयंप्रकाशित व्हा !) स्वत:चा विकास स्वत: हा करण्याचा संदेश तथागत गौतम बुद्धांनी दिला .अशा अनेक मानव कल्याणकारी विचार मानवांना देण्यात आले .जो व्यक्ती त्रिशरण पंचशील , अष्टांग मार्ग ,दहा पारमिता,विपश्यना मानवाच्या मानवाची आचारसंहिता पाळतो.त्या व्यक्तीमध्ये मानवी कल्याणकारी विचार निर्माण होऊन वाईट कुकर्म विचारधारा ,द्वेष,भष्ट्राचार व मानवाला हानिकारक गोष्टी कायमच्या दूर ठेवतो म्हणूनच या विश्वामध्ये युद्धाची नव्हे तर तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांची गरज आहे .प्रत्येक मानवाला मन शांततेची गरज आहे.सुखमय जीवन जगण्याची गरज आहे .आजच्या धावपळीच्या युगात माणूस विकासासाठी आणि द्रव्यसंचय करण्यासाठी सारखा धावपळ करीत आहे.स्थितप्रज्ञ अवस्था,शिल समाधी पासून तो दूर जात आहे.तो असंख्य समस्या निर्माण करीत आहे.गरजा प्रमाणापेक्षाही वाढलेल्या आहेत . आशा ,अपेक्षा ,आकांक्षा व ईच्छा हेच मूळ दुःखाचे कारण आहे .दुःख निरोध म्हणजे दुःख नष्ट करण्याचा शोध लावणारे जगातील पहिले महा शास्त्रज्ञ विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध होते.आज त्यांची विचारसरणी प्रत्येक महिला पर्यंत पोहोचली तर मानव सुखमय जीवन जगण्यास समृद्ध बनेल.भारताला बुद्धाची भूमी म्हणून ओळखल्या जाते. सत्यता, अहिंसा ,शांतता ,समता ,विश्वबंधुभाव ,विद्या,ज्ञान ,न्याय प्रणाली व लोककल्याण सुखमय जीवन जगण्याची जीवनशैली विश्वात प्रत्येक मानवाच्या अंतकरणात वसलेली आहे .अधर्म,कुकर्म( वाईट काम)गुलामगिरीचे वर्चस्व,अशांतता ,अराजकता ,दहशतवाद ,अविद्या ,अज्ञान ,अंधश्रद्धा ,द्वेष ,असत्यता ,अहंकार,खुळचट रूढी,परंपरा,अंधविश्वास,धन जमा करण्याचा हव्यास व धनाचा अयोग्य वापर,नियोजनाचा अभाव असलेल्यांचा विनाश निसर्गाच्या माध्यमातून आपोआपच होणार आहे.हे चिरकाल सत्य आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 3 जुलै 1851 रोजी पुणे येथील बुधवार पेठेत अण्णा चिपळूणकर यांच्या वाड्यात अस्पृश्यासाठी शाळा सुरू केली ही फार मोठी विश्वातील क्रांती आहे सर्व महिलांना समान अधिकार ताकद आणि संधी निर्माण करून त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण सर्वांगीण विकास करणे महत्त्वाचे कार्य आहे. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शाळा काढून स्त्री शिक्षणाची सुरुवात करून सनातन लोकांचा हजारो वर्षांचा जाचक,अन्यायकारक रूढी परंपरांचा इतिहास नष्ट केला आणि महिलांची ज्ञान शक्ती वाढवून इतिहास घडविला सर्व महिलांच्या प्रेरणादायी आदर्श ज्ञान ज्योती क्रांतिकारक सावित्रीबाई फुले ज्ञान स्रोत बनल्या. महिलांना शिक्षणाची मोठ्या प्रमाणात संधी प्राप्त होऊन त्यांचा विकास करता आलेला आहे .महिलांसाठीच नव्हे तर सर्व मानवाच्या कल्याणासाठी सज्ञानासाठी राजश्री शाहू महाराज यांनी 24 जुलै 1917 रोजी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यासाठी वटहुकूम काढून महान कार्य केले आहे. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये महिलांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी विविध कायद्यांची तरतूद करून मानवांचा विकास केला. स्वातंत्र्य,शिक्षण,आरोग्य व आर्थिक प्राबल्यांच्या योजना राबवून मानवांचा सर्वांगीण विकास कायद्याच्या माध्यमातून केला.आपल्या संविधानामध्ये स्वातंत्र्य,समता ,बंधुभाव व न्याय ही तत्वे असल्यामुळे गुलामगिरी नष्ट झाली आहे .आपले संविधान गुलाम राष्ट्रांना मुक्त करण्याची प्रेरणा देते.त्यामुळे स्त्री या गुलामगिरीतून पारंपारिक रुढीतून अन्याय अत्याचार अंधश्रद्धा मधून मुक्त मुक्त झाल्या आहेत कारण महिलाही उपजत गुणांची सृजनशीलता आहे .डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी आठ जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबई येथे सर्वांसाठी सिद्धार्थ कॉलेज काढले व सर्वांसाठी शिक्षणाची दारे उघडली.मानव कल्याणकारी महिलांची विशेष कार्याची जाणीव ठेवा .त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात त्यांच्या कार्याचा उपयोग करून घेऊन आपले जीवन आनंदी व यशस्वी बनवा.त्यांचे आत्मचरित्राचे वाचन करून इतरांना वाचन करण्यासाठी प्रेरित करा.महिलांचा सन्मान आदर करा कोणीही लादलेल्या विचारांचे गुलाम बनू नका. महिलांनी स्वतःच्या सतत विवेक बुद्धीने विचार करून मानवांचा विकास करावा.ज्या ज्या महिलांनी मानवांच्या सेवेसाठी कार्य केले आहे अशा महान मातांना वंदन करतो आणि थांबतो.
मा. गाडगे शहादेव बंडुजी
मुख्याध्यापक तथा स्काऊट मास्तर
जिल्हारिषद उच्च प्राथमिक शाळा ढाकेफळ ता. घनसावंगी. जिल्हा. जालना. (महाराष्ट्र राज्य).
मोबाईल नंबर 79 72 24 30 79
Discussion about this post