
जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या अजित पवार गटाच्या वतीने पुणे शहरात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान भवानी पेठ येथील भवानी माता मंदिरामध्ये करण्यात आला यामध्ये कॅन्टोन्मेंट रुग्णालयाचे वरिष्ठ डॉ,अनुराधा डोळस, पुणे महानगरपालिकेतील अधिकारी अंजली सालार, शिक्षिका सुषमा अग्रवाल, सामाजिक कार्यकर्त्या रोशन आरा पटेल, जिम ट्रेनर अमृता जेधे, कुरेशी समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा परवा कपासे या महिला भगिनींना राष्ट्रवादी काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष नरेंद्र जाधव यांच्या हस्ते शाल पुष्परोप व साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर महिला आघाडी सरचिटणीस शलाका पाटील, रीना अडागळे, नीता अडागळे, निर्जला गायकवाड, अर्चना वाघमारे, अर्पणा कुंभार, प्रज्ञा वाघमारे, कुरेशी रोशन आरा, महेंद्र लालबिगे, दिनेश अर्धाळकर, दिनेश परदेशी, शब्बीर शेख, राहुल तांबे, अनिल अग्रवाल आदि यावेळी उपस्थित होते
Discussion about this post