
सोयगाव :
तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अकरा वाजता ग्रामपंचायत आवारात विविध कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या २५ महिलांना सरपंच स्वाती पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
जरंडी ग्रामपंचायतीच्या माझी वसुंधरा उपक्रमा अंतर्गत महिला दिनी शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा,माध्यमिक शाळा,महिला बचत गट,ग्रामसंघ,सामाजिक कार्य,अंगणवाडी, आदी ठिकाणी उत्कृष्ट कार्य केलेल्या २५ महिलांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाने जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय कुटुंब कल्याण शिबीर उत्कृष्ट पणे राबवून गेल्या सहा महिन्यात ३८५ महिलांच्या कुटुंब नियोजन शस्रक्रिया केल्या बद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ स्नेहल वारंगणे, यांच्या सह आरोग्य महिला कर्मचारी यांना ग्रामपंचायत कडून गौरव पुरस्कार देण्यात आला.
तसेच अंगणवाडी सेविका अक्का बाई मोरे,आशा पंडित, पुष्पां वाघ,सुरेखा अहिरे यांनी गावात कुपोषण मुक्त करून शून्यावर कुपोषण आणल्या मुळे त्यांचाही कुपोषण मुक्त पुरस्काराने सन्मान करण्यात आला.मदतनीस पुष्पां मोरे,ताई गायकवाड, वैशाली सोनवणे, विजया मोरे यांनी अंगणवाडी त महास्वच्छता मोहिमेत कचरा मुक्त केल्याने त्यांना स्वच्छता ताई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच महात्मा फुले विद्यालयाच्या भारती पाटील,सुजाता शिंदे,प्राथमिक शाळेच्या वैशाली महाजन,आशा स्वयंसेविका मंगला बाई बिऱ्हारे, शालिनी महाजन यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच स्वाती पाटील,उपसरपंच संजय पाटील, ग्रामपंचायत सद्स्य नलिनी पवार,द्वारकबाई राठोड, लीला बाई निकम,ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे, आदींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संतोष कुमार पाटील,सतीश बाविस्कर,भास्कर निकम,सिद्धार्थ दांडगे आदींनी पुढाकार घेतला..
Discussion about this post