
INDvsNZ- आज फायनल सामना, कोण बाजी मारणार ज्याची सर्वांना उत्सुकता होती तो दिवस अखेर आला आहे. कारण आज चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना दुबईत होणार आहे. या सामन्यात भारत विरूद्ध न्यूझीलंड संघ आमने-सामने असतील. हा सामना आज दुपारी 2.30 वाजता सुरू होईल.
या सामन्यात भारतीय संघ पराभवाचा बदला घेणार की न्यूझीलंड पुन्हा जेतेपदाला गवसणी घालणार? याकडे सर्वांचे लक्ष असेल. प्रेक्षक हा सामना हॉटस्टार आणि स्टार स्पोर्टच्या चॅनेलवर पाहू शकता. तसेच हा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
Discussion about this post