सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक – ०९.०३.२०२५
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा सोलापूरच्या माढा तालुका महिला आघाडी सरचिटणीसपदी वृषाली वहिल यांची निवड करण्यात आली.
यावेळी माढा नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. वहिल मॅडम या जाधववाडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
तालुक्याच्या शिक्षक नेत्या सारिका गारूडे-नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण समितीचे काम जोमाने करणार आहे असे वहिल मॅडम यांनी सांगितले.
निवडी बदल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Discussion about this post