
निलंगा विधानसभा प्रतिनिधी तेलंगे सिद्धेश्वर
दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चवणहिपरगा तालुका देवणी येथे सी.सी.टीव्ही बसवण्यात आली. या सी.सी.टीव्ही चे उदघाटन आदरणीय श्री भगवानदादा पाटील साहेब ( संचालक लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक ), आदरणीय श्री शंकरराव पाटील साहेब ( माजी सभापती पंचायत समिती देवणी ), श्री संभाजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय चवणहिपरगा यांच्याकडून सी.सी.टीव्ही बसवण्यात आली. सी.सी.टीव्ही बसवण्यासाठी चवणहिपरगा नगरीचे सुपुत्र श्री बब्रुवानजी पाटील साहेब, सामाजिक व युवा कार्यकर्ते श्री माधवरावजी मोरे, उपसरपंच श्री ईस्माईलजी शेख यांनी पुढाकार घेतला. यावेळी शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिक्षक,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Discussion about this post