विलास लव्हाळे जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडून वैजापूर – घरफोडी करून चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याचांदीचेदागिने असाएकूण एक लाख २० हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना तालुक्यातील खंबाळा येथे शुक्रवारी रात्री घडली
. जितेंद्र नामदेव खंडागळे हे खंबाळा शिवारात गट नंबर १२ मधील शेतात राहतात. शुक्रवारी सर्व कुटुंबीयझोपीगेले. त्यानंतर रात्री पाठीमागील घराचा दरवाजातोडुन चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम ७० हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले
. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी जितेंद्र खंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार किसन गवळी हे करीत आहेत.
Discussion about this post