
लहुजी पॅन्थर सेनेची आक्रमक भूमिका..
सांगोला – उद्या दि.१२ बुधवार रोजी दलित समाजाच्या न्याय व हक्का साठी सांगोला पंचायत समिती वर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती बहुजन भारत संघटनेचे अध्यक्ष नितीन रणदिवे यांनी दिली आहे..
या मोर्चातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे.. १. घरकुल मंजूरीसाठी व उर्वरित हप्ते बँकेत जमा करण्यासाठी संगनमताने पैसे मागणाऱ्या ग्राम सेवक, कारकून, गटविकास अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी.
२. जुजारपूर गावातील दलित वस्तीमधील पेव्हर ब्लॉकचे काम टेंडर ओपन व्हायचे आत केले आहे. तरी या कामाची सखोल चौकशी करुन दोषी सरपंच, ग्रामसेवक व बोगस ठेकेदार यावर कठोर कारवाई करावी.
३) महिला व बाल कल्याण विभागामध्ये महिलांसाठी सांगोला पंचायत समितीमार्फत वाटप करण्यात आलेल्या साधन सामुग्रीमध्ये मोठ्या
जी पँथर सेना सांगोला लहुज
प्रमाणात (बोगस लाभार्थी दाखवून) भ्रष्टाचार केला असून संबंधीतावर चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
४) घरकुलधारकांना मोफत वाळु पुरवठा तात्काळ करण्यात यावा.
सन २०२२-२३, २०२४ मध्ये सर्व लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या विविध योजना व लाभार्थी यादी गावोगावी सार्वजनिक ठिकाणी व दलित वस्तीमध्ये प्रसिध्द
करण्यात यावी.
५) दलित वस्तीमध्ये काम खातेनिहाय ासाठी प्रामुख्याने मागासवर्गीय ठेकेदारांना प्राधान्य देण्यात यावे.
६) मागासवर्गीयासाठी ग्राम पंचायतीमध्ये आरक्षित १५% निधी ग्रामसेवक व सरपंच संगनमताने इतर ठिकाणी खर्च करत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून तो थांबवावा. तसेच निधी खर्च करण्यासाठी असलेले नियम व करण्यात आलेला
सन २०२२,२३, २०२४ मध्ये करण्यात आलेला खर्च प्रत्येक ग्रामपंचायतीने सार्वजनिक ठिकाणी व दलित वस्तीमध्ये प्रसिध्द करावा.
या प्रमुख मागण्यांसाठी बुधवार दि. १२ रोजी पंचायत समितीवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे तरी या मोर्चाला दलित बांधवांनी म ोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लहुजी पॅन्थर सेनेचे अध्यक्ष नितीन रणदिवे यांनी केले आहे..
Discussion about this post