१६ चमुंनी घेतला सहभाग..
विजेत्या ना दिले बक्षीस…

(पांढरकवडा तालुका प्रतिनिधी) :
माॅ. जगदंबा आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था शिबलाच्या वतीने विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा सत्कारा सह सामुहिक नृत्य स्पर्धेचे आयोजन येथील शहिद नागेश्वर जिड्डेवार सांस्कृतीक भवनात केले.
संस्थेच्या अध्यक्षा वाणी अखिल कोठारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.उद्घाटन वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिता वानखेडे यांनी केले.अध्यक्ष स्थानी सहाय्यक वनसंरक्षक आशिष देशमुख होते.अनेक महिलांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,एलिग्ट ग्रुप ने मिळवला प्रथम क्रमांक.या सर्व विजेत्यां नृप ला रोख पारितोषिकासह स्मृती चिन्ह भेट म्हणून देण्यात आले..
Discussion about this post