पांढरकवडा तालुका प्रतिनिधी. टिपेश्वर अभयारण्यातील पारवा नवा परीक्षेत्रातील मंगी बिटमध्ये अर्ची वाघीण च्या सितारा नामक दिड वर्षाच्या मादि वाघीण च्या पायात फास अडकुन असल्याचे १२ मार्च रोजी सकाळी अभयारण्यत प्रशासनाच्या लक्षात आले होते. शिग्र बचाव दलास पाचारण करण्यात आले.सहा वाजे दरम्यान तिला डॉर्ट मारून बेशुद्ध करून तिच्या पायातील दोरीचा फास काढण्याची यशस्वी कामगिरी व कर्मचारी, कर्मचारी, पशू संवर्धन अधिकारी यांच्या सहकार्याने पार पडली . पशू संवर्धन अधिकारी यांनी तीला अॅडिटोर दिला.काही वेळा नंतर सुद्धीवर आलेली ती वाघीण पुन्हा अभयारण्य त निघून गेली.
सदर वाघीणीस फास मुक्त करण्यासाठी वनसंरक्षक क्षेत्र सहाय्यक मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एम.आदर्शरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबविण्यात आली..
Discussion about this post