“प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीची ठेकेदाराकडून लूट..”
लंगरपेठ ते नागोंळा रस्ता दोन महिन्यातच पूर्णतः उखडला आहे. सदर रस्त्याचे काम निम्कृष्ट झाले असून संबंधित ठेकेदाराला काळी यादी टाकण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे करणार असल्याचे ग्रामस्थातून चर्चा होतं आहे.

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा लगंरपेठ ते नागोंळा हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला.
या रस्त्याच्या कामासाठी ८८४.२३ कोटी रुपयांचा निधी मिळाला. दोन महिन्यापूर्वी या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्याकामात निष्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने रस्ता पूर्णता उखडलाआहे.
एकूण १०.०८० किमी लांबी असणाऱ्या रस्त्याची वाट लागली आहे. नव्याने डांबरी करण्यात आलेल्या रस्त्यावरील खडी उचकटून पडली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत.
त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर कवठेमहाकाळ हुन आरेवाडी येथे जाण्यासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. परंतु रस्त्याच्या निष्कृष्ट कामामुळे ठेकेदाराचे पितळ उघडे पडले आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर केलेल्या निधीचा ठेकेदाराने लूट केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या ठेकेदाराची सखोल चौकशी करून ठेकेदाराला कायमस्वरूपी काळा यादीत टाका . थर्ड पार्टी ऑडिट द्वारे आणि गुण नियंत्रण कक्षा कडून रस्त्याच्या दर्जा तपासण्याची मागणी बांधकाम विभागाकडे करणार असल्याची चर्चा ग्रामस्थातून होत आहे.आता, बांधकाम विभाग ठेकेदारावर याप्रकरणी काय कारवाई करणार…? रस्त्याचे काम कशाप्रकारे होणार….? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
Discussion about this post