“सांगली मिरजेसह पूर्व भागात पावसाची संततधार..!”
गेल्या आठवड्याभराच्या विश्रांती नंतर पावसाने पुन्हा दमदार आगमन केले आहे.
शुक्रवार पासून सांगली जिल्ह्यासह मिरज आणि तालुक्यातपावसाची संततधार सुरु आहे.
मिरज तालुक्यासह तासगाव मणेराजुरी सह येळावी वायफळे मांजर्डे परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. शुक्रवारी मध्यरात्री पासून संततधार पावसास सुरुवात झाली शनिवार दिवसभर पाऊस बरसत राहिला आज रविवार सकाळी थोडी पावसाने उसंत घेतली असून शेतात मात्र पाणीच पाणी झाले आहे.

मेघा नक्षत्रामध्ये पहिल्यांदाच गडगडाटी सह पाऊस झाल्याचे जुने जाणकार मंडळींचे मत आहे.
या पावसाने जोर धरल्याने शेतीची मात्र कामे खोळंबली आहेत. कोल्हापूर सातारा जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पाणलोट क्षेत्रातही पुन्हा दमदार पावसास सुरुवात झाली आहे. ऐतिहासिक राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला आहे.
तर कोयना आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पुन्हा पावसाची संततधार सुरु झाली आहे. मिरज आणि परिसरात पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
Discussion about this post