प्रतिनिधी -संकेतअस्वार
पुणे
रविवार दिनांक 25-8-2024 रोजी स्व. विलासराव तांबे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण समारंभ तसेच नूतन इमारतीचे उद्घाटन पुस्तक प्रकाशन समारंभ शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ फार्मसी डुंबरवाडी ओतूर या ठिकाणी संपन्न झाला.
स्वर्गीय विलासरावजी तांबे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण पद्मविभूषण माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब( माजी केंद्रीय कृषिमंत्री भारत सरकार) यांचे शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष माननीय विशालरावजी तांबे यांनी केले. स्वर्गीय विलास तांबे सर असताना आपण डुंबरवाडी या ठिकाणी कॉलेजचे भूमिपूजन केले होते. आज त्या ठिकाणी भव्य दिव्य असे शैक्षणिक संकुल असून या शैक्षणिक संकुलात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.आज शिक्षणाचा हा वटवृक्ष डुंबरवाडीच्या माळराणावर उभा आहे . या संकुलात संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विलास तांबे सर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण आपल्या शुभहस्ते व्हावे अशी आमची मनोमन इच्छा होती आज ती पूर्ण झाली आहे . पुंडलिका भेटी परब्रह्म आले. असा आनंद आम्हाला झाला आहे. सदैव आपल्या ऋणात राहून अशी आभाळागत माया आमच्यावर कायम अशीच राहू द्या. अशा पद्धतीने ऋण व्यक्त केले. त्यानंतर स्वर्गीय विलास तांबे सर यांच्या कार्याची चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी परिसंवाद हा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी पद्मविभूषण माननीय शरदचंद्रजी पवार साहेब व मा. डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे (संसदरत्न खासदार शिरूर लोकसभा)यांना प्रश्न विचारले.
विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाची उत्तरे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि मा. डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांनी समर्पक भाषेत दिली. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय विशालशेठ तांबे आणि संस्थेचे सचिव श्री मा .वैभवशेठ तांबे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. मा.मधुकर डोळे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार त्यांचे कुटुंबाने स्वीकारला .
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय डॉ अमोल रामसिंग कोल्हे ( संसदरत्न खासदार शिरूर लोकसभा )यांनी स्वीकारले.
सदर कार्यक्रमासाठी खालील मान्यवर उपस्थित होते. माननीय अतुल बेनके (आमदार जुन्नर विधानसभा) माननीय श्रीहरी भाऊसाहेब तांबे(उपाध्यक्ष, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ) माननीय श्री मयूरशेठ ढमाले(कोषाध्यक्ष, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ ओतूर)माननीय. अनिल शेठ तांबे (अध्यक्ष ग्रामविकास मंडळ ओतूर)
माननीय शरददादा सोनवणे (माजी आमदार जुन्नर विधानसभा, )माननीय बाळासाहेब दांगट (माजी आमदार जुन्नर विधानसभा ) माननीय संजय राव काळे (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर) माननीय देवदत्त निकम (कार्याध्यक्ष पुणे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पवार) माननीय सत्यशील शेरकर (चेअरमन विघ्नहर सहकारी साखर कारखाना) माननीय नीलमताई तांबे(संचालिका विघ्नहर सहकारी साखर कारखाना) श्री जगन्नाथ आप्पा शेवाळे,मा. रंगनाथशेठ घोलप,माननीय माऊली शेठ खंडागळे (तालुकाप्रमुख शिवसेना ) माननीय रघुनाथ शेठ लेंडे (माजी सभापती पंचायत समिती जुन्नर) माननीय देवराम लांडे (माजी सदस्य जिल्हा परिषद पुणे), माननीय शितलताई गोरे (सरपंच ग्रामपंचायत डुंबरवाडी) माननीय संतोष टिकेकर (आदर्श सरपंच ग्रामपंचायत ठीकेकरवाडी), माननीय सभाजीनाना लोहोटे (माजी सरपंच ग्रामपंचायत डिंगोरे), मा. शांताराम वारे (माजी सदस्य ग्रामपंचायत ओतूर) मा. छबुराव सुदाम तांबे (प्रगतशील शेतकरी) श्री शेखरशेठ डुंबरे श्री वसंत तांबे ,श्री विलास जाधव (माजी पंचायत समिती सदस्य) उत्तम शेठ गाढवे, श्री पांडुरंग ताजणे श्री. सोपान शेठ तांबे श्री. अंकुशशेठ आमले, श्री रामदासशेठ घोलप, श्री बाळासाहेब हरकुजी डुंबरे, श्री सुभाषशेठ डुंबरे, श्री चंद्रकांत शेठ डुंबरे, ॲड. विजयराव तांबे, डॉ. सुभाष हांडे, श्रीमती मंगलताई ढमाले(माजी प्राचार्या, सावित्रीबाई फुले विद्यालय ओतूर, श्री निवृत्तीशेठ काळे ,श्री तुषार थोरात, श्री दयानंद डुंबरे, श्री हेमंत डुंबरे, श्री बापू शिळीमकर, श्री विराज रुपनवर, डॉ. किरण शिंदे,
डॉ.श्री गणेशजी दामा प्राचार्य,शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी , डॉ.गोविंद खरात प्राचार्य,शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डुंबरवाडी , डॉ.श्री देवकर संजय प्राचार्य विलास तांबे कॉलेज ऑफ एज्युकेशन डुंबरवाडी, डॉ.श्री काकड रमेश प्राचार्य ,शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, स्मित अलेक्स प्राचार्य,व्हिजन इंटरनॅशनल स्कूल डुंबरवाडी, श्री शेख बशीर प्राचार्य ,सावित्रीबाई फुले विद्यालय व सिताबाई तांबे ज्यू. कॉलेज ओतूर. श्री बोबडे दिलीप मुख्याध्यापक,वीर सावकर विद्यालय पांगरीमाथा , श्री बोऱ्हाडे माणिक मुख्याध्यापक ,शारदाबाई पवार विद्यालय आंबेगव्हाण श्री पिंगट राहुल मुख्याध्यापक,प्रतिभाताई पवार प्रशाला ओतूर. संस्थेतील सर्व शाखांचे प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याद्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी , पालक, व ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्रसंचालन – विठ्ठल शितोळे सर , संतोष झावरे यांनी केले.
आभार प्रदर्शन डॉ.गणेश दामा यांनी केले.
Discussion about this post