खानापूर आटपाडी तालुक्याचे युवा नेते मा.सुहास भैया बाबर यांच्या मार्फत तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्या साठी रक्षाबंधन भेट हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

त्याच माध्यमातून आज खानापूर तालुक्यातील पंचलिंगंनगर ग्रामपंचायत यांचे मार्फत अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांना रक्षाबंधन भेट वितरण करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत पंचलिंगंनगरचे सरपंच.संग्राम नलवडे,उपसरपंच.अमोल शेळके,सदस्य.मधुकर नलवडे,मनोहर नलवडे,गावचे पोलीस पाटील गिरिदेव पाटील.माजी सरपंच दत्तात्रय नलवडे,ग्रामसेवक.विलास जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
Discussion about this post