:- :तालुका प्रतिनिधी :- शेतकरी न्याय यात्राचे चिमूर तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये प्रामुख्याने राज्य व केंद्र सरकारकडे मागितलेल्या प्रमुख मागण्या…
१. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५०.००० रुपये तात्काळ मदत करण्यात यावी.
२. शेतकऱ्यांना पिक विमा तात्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्यात यावी.
३. अतिवृष्टीमुळे बाधित होऊन घर पडलेल्या कुटुंबांना तात्काळ घरकुलाचा लाभ देण्यात यावा.
४. कृषी पंपांना रात्री मिळणारी वीज दिवस पाळी करून २४ तास देण्यात यावी.
५. घरगुती वीज वापरण्यासाठी लावण्यात येणारे स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये.
६. रोजगार हमीच्या कामावर असलेल्या मजुरांची व कुशल कामाची पैसे तात्काळ देण्यात यावे.
७. घरकुल योजनेचे पैसे लाभार्थ्यांना तात्काळ देण्यात यावे.
८. वन जमिनीचे पट्टे लाभार्थ्यांना लवकरात लवकर देण्यात यावे.
९. अतिवृष्टीमुळे पडलेल्या घर व गुरांचे गोठे पिढीत कुटुंबांना तात्काळ मदत करण्यात यावी.
१०. वाढविण्यात आलेले विजेची दरवाढी मागे घेण्यात यावी.
११. ताडोबा लागून असलेल्या शेतकऱ्यांना शेतमालाची वन्यप्राणापासून संरक्षण करण्याकरिता मागील त्याला सरसकट जाळीचे कुंपण मोफत देण्यात यावे.
१२. वन जमिनीवरील शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई वन विभागाने त्वरित थांबवावी.
असे अनेक प्रलंबित मागण्या व समस्येमुळे शेतकऱ्यांना व क्षेत्रातील सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासामुळे चिमूर तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. व मा . तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेवराव किरसान साहेब यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
या सदर मोर्चात प्रामुख्याने उपस्थित श्री . अविनाश भाऊ वारजूकर माजी आमदार चिमूर, श्री. राम राऊत सर सेवादल काँग्रेस, श्री धनराज भाऊ मुंगले प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी, श्री सतीश भाऊ वारजूकर माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर, श्री संजय भाऊ डोंगरे माजी संचालक सीडीसीसी बँक चंद्रपूर, श्री गजानन भाऊ बुटके सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी, श्री विजय गावंडे पाटील तालुकाध्यक्ष काँग्रेसची चिमूर , श्री संजय भाऊ घूटके महासचिव जिल्हा काँग्रेस कमिटी, श्री राजूभाऊ लोणारे सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी, श्री प्रदीप भाऊ तळवेकर अध्यक्ष चिमूर ओबीसी काँग्रेस तथा पर्यावरण विभाग , श्री राजूभाऊ कापसे तालुकाध्यक्ष किसान सेल, श्री उमेश भाऊ हिंगे माजी नगर सेवक चिमूर , श्री तुळशीरामजी बनसोड माजी सदस्य जिल्हा परिषद , श्री विवेक भाऊ कापसे महासचिव जिल्हा काँग्रेस कमिटी , श्री घनश्याम भाऊ येरुंकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत , श्री दिलीप भाऊ गंधरे ज्येष्ठ नेते काँग्रेस , श्री मधुकर मुंगले माजी ग्रामपंचायत सदस्य , श्री रत्नकार विटाळे माजी ग्रामपंचायत सरपंच , श्री दीदेव जी बानकर ज्येष्ठ नेते काँग्रेस , श्री राजूभाऊ दांडेकर नेते चिमूर काँग्रेस , श्री बालाजी भाऊ कोयचाळे , श्री शंकर भाऊ माहुरे अध्यक्ष माहुरे बहुउद्देशीय संस्था खडसंगी , श्री राजूभाऊ चौखे, श्री बंडूभाऊ चौखे, सौ माधुरीताई रेवतकर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी, सौ प्रीतीताई दीडमुठे सरपंच, सौ भावनाताई बावनकर ओबीसी महासंघ, सौ गीतांजली ताई थूटे, सौ वनिताताई झिंगरे, सौ शेंबेकर ताई तसेच चिमूर तालुक्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस व सर्व सेल चे पदाधिकारी व कार्यकर्ते गणउपस्थित होते.
Discussion about this post