अहमदपूर तालुका प्रतिनिधी
:: प्रफुलचंद्र केंद्रे
====≠============
दि.30/08/240 रोजी नागझरी , खंडाळी , वंजारवाडी ,अंधोरी, येथे शेतकरी बंधु च्या शेतावर जाऊन तालुका कृषि अधिकारी सचिन बावगे यांनी केले मार्गदर्शन सलग तुर लागवड केलेल्या शेतकरी बंधुच्या बांधावर भेट तसेच मिरची लागवड संजय इप्पर यांच्या शेतात भेट व प्रकाश इप्पर यांच्या शेतात कापुस पिकाची लागवड पहाणी केली आणि सलग तुर टोकण भास्कर इप्पर यांच्या शेतात भेट देत उपस्थित शेतकरी बंधुना तुर पिकावरील बुरशी रोग नियत्रंण विषयी सविस्तर मार्गदर्शन करत बुरशीनाशकाची फवारणी बाबत तसेच पाने गुंडाळणारी अळी नियत्रंण बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सोबत कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी श्री प्रसाद गायकवाड यांनी कापुस पिकातील खत व्यवस्थापन व किड व रोगा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सोबत अधिकारी कर्मचारी कृषि सहाय्यक विपुल जाधव , तसेच कृषि सहाय्यक प्रविण नाळापुरे. कलमे विष्णु कृषि सहाय्यक नागझरी खंडाळी उपस्थित शेतकरी बंधु संजय गंगाधर इप्पर
गणेश आलापुरे, प्रकाश इप्पर, सुशीलकुमार इप्पर, अच्युत इप्पर, रमेश इप्पर,सागर इप्पर,गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Discussion about this post