ग्रामपंचायत आष्टोना ता. राळेगाव (जि. यवतमाळ) कडून “योजना दूत” योजनेबाबत माहिती लपवल्याचा आरोप; ग्रामसभेची पारदर्शकता सुनिश्चित करण्याची नागरिकांची मागणी
आष्टोना, राळेगाव (जि. यवतमाळ): मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागू करण्यात आलेल्या “योजना दूत” योजनेबद्दल ग्रामपंचायत कार्यालय आष्टोना कडून नागरिकांना माहिती दिली गेली नाही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यासोबतच, ग्रामसभेत नागरिकांना तक्रारी मांडू दिल्या जात नसल्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नागरिकांनी आगामी ग्रामसभा अधिक पारदर्शक करण्याच्या दृष्टीने काही ठोस उपाययोजना सुचवली आहेत. या उपाययोजनांमध्ये ग्रामसभेची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची अनुमती, ती शासनाच्या अध्यक्षतेखाली घेण्याची मागणी, तसेच 2014 ते 2024 या कालावधीत ग्रामपंचायतीने केलेल्या कामांची सखोल चौकशी व ऑडिट करण्याची मागणी समाविष्ट आहे.
नागरिकांच्या या मागण्यांनी प्रशासनाची जबाबदारी वाढवली असून, ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
Discussion about this post