नितीन वाघमोडे 9673044270
दिंद्रुड / प्रतिनिधी :- खोलेश्वर मल्टीस्टेट ला सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार जाहीर
शिर्डी येथे फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट द्वारे सहकार गौरव पुरस्कार सोहळा २०२३ दि. ८ व ९ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट ही संस्था भारतातील सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांचे शासकीय धोरण ठरवणे व सहकार क्षेत्रात काम करत असताना येणाऱ्या अडचणी राष्ट्रीय स्तरावर मांडण्याचे काम करते.
राष्ट्रीय फेडरेशन ऑफ मल्टीस्टेटचे विद्यमान अध्यक्ष सुरेश वाबळे तर उपाध्यक्ष अंकलकोटे पाटील हे काम पाहतात. राष्ट्रीय फेडरेशन ऑफ मल्टीस्टेटच्या वतीने सहकार चळवळीमध्ये आपले योगदान देणारे व शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करून कार्य करणाऱ्या संस्थांचे मूल्यमापन करून संस्थांना विविध पुरस्काराने सन्मानित केले जाते.सन २०२२ ते २०२३ या आर्थिक वर्षामध्ये ७६ ते १२५ कोटी ठेवी या गटामधून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार हा खोलेश्वर मल्टीस्टेट दिंद्रुड संस्थेस जाहीर झालेला आहे. या पुरस्काराचे वितरण दिनांक ८ व ०९ सप्टेंबर २०२४ रोजी शिर्डी येथे आयोजित केलेल्या सहकार परिषदेमध्ये केंद्रीय निबंधक आनंद कुमार झा यांच्या शुभहस्ते व फेडरेशन ऑफ मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांच्या उपस्थितीमध्ये वितरित केले जाणार आहे. खोलेश्वर मल्टीस्टेट या संस्थेला यापूर्वी देखील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले असून खोलेश्वर मल्टीस्टेटने महाराष्ट्रातच नव्हे देशात नाव लौकिक केले आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मां. दिलीपराव पारेकर साहेब यांचे अचुक मार्गदर्शन व मुख्य कार्यकारी अधिकारी विलास काका पारेकर यांच्या कौशल्यपूर्ण व्यवस्थापनाने संस्थेने उल्लेखनीय कार्य करत पुरस्काराचा मान संस्थेस प्राप्त केला आहे. मार्च २०२३ अखेर ९० कोटी ठेवी, ६० कोटी कर्ज वाटप, १५० कोटी पेक्षा अधिक व्यवसाय पूर्ण केला आहे. केवळ व्यवसाय वाढ हे उद्दिष्ट न ठेवता सुरक्षित व्यवसाय या उद्देशाने अधिक सुरक्षित सोनेतारण कर्ज वाटप करून सभासदांच्या ठेवींना सुरक्षा देण्याचे काम संस्थेने केले आहे.
त्यामुळे सहकार क्षेत्रात खोलेश्वर मल्टीस्टेटने एक आदर्श संस्था म्हणून मराठवाड्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच केवळ व्यवसाय न करता संस्था सामाजिक,धार्मिक व सांस्कृतिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. या सर्व बाबीची दखल घेत राष्ट्रीय फेडरेशन ऑफ मल्टिस्टेटने संस्थेला सन २०२३ चा सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार जाहीर केला आहे. संस्थेचे अध्यक्ष मां. दिलीपराव पारेकर यांनी सदरील पुरस्कार संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी, नित्यनिधी प्रतिनिधी, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक सभासद यांना समर्पित केला आहे.
Discussion about this post