एकी कडे संस्थेचा आणि सभासदांच्या हिताच्या दृष्टीने विचार करणारे हेच संचालक मंडळ मात्र संचालक मंडळात आहेत पण चेअरमन सह काही संचालक हे संस्थेच्या स्कीम कमांड एरियामध्ये संस्थेचे पाणी घेत नाहीत. तर ते अन्य मार्गाने शेतीसाठी पाणी घेतात.
ही बाब संस्थेच्या हितास बाधा निर्माण करणारी असून संस्थेचे मोठे नुकासान करण्यास यांचा सिंहाचा वाटा आहे. संचालक होवून खुर्ची मिरवायला पाहिजे आणि पाणी घ्यायला नको होय. संस्थेच्या स्कीम कमांड एरियामध्ये 10-12 एकर क्षेत्र असणारे फक्त 1-2 एकर ला पाणी मागणी अर्ज करतात मग राहिलेल्या क्षेत्राला हे पाणी कुठून घेतात हा प्रश्न इतर संचालकांनी विचारायला पाहिजे होता पण ते मुग गिळून गप्प याचे कारण संगणमत.संचालक पुर्ण क्षेत्राला पाणी घेत नाहीत त्यांनी विहित आकरातील पाणी पट्टी प्रमाणे निम्मी पाणीपट्टी देणे हे कायद्याने बंधनकारक आहे. आणि ते देत नाहीत आणि ते वसूल कोण करणार चेअरमन सह अन्य काही संचालक पाणी घेत नाहीत.
जे विचारायला पाहिजे ते संगणमताने यांच्यावर पाघरून घालतात. मग काय..? यांना विचारणार तरी कोण जेव्हा असा प्रश्न सभासदाच्यात उपस्थित होतोय तेंव्हा सभासद माहिती मागितली की त्यांना चुकीच्या पद्धतीने खुलासा देतात आता नविन कारण वार्षिक सर्वसाधारण सभेच कारण सांगतात.संस्थेतून माहिती मिळत नाही म्हणून वरिष्ठांना सांगव लागत आणि वरिष्टांनी पत्र व्यवहार करून माहिती तात्काळ देण्यास सांगितले की मग कर्मचाऱ्याना त्रास होतो.कर्मचारी राजीनामा देतात. मग कारण काय कामाचा व्याप खुप वाढलाय वार्षिक सर्वसाधारण सभेची काम पेंडिंग आहेत. त्यात ही माहिती देणे आम्हाला त्रास होतोय. मग माहिती मागितल्या पासून दोन महिने काय झोपा काढत होता. कि संचालक मंडळ माहिती देव नको म्हणून सांगितलेत.
पण यातून आत्ता कोणाला सुट्टी नाही. कोण कोणाला वाचवतय हेच सभासदांना कळलय. जनरल मिटींगला जाब विचारला तर पुरावा सिद्ध होईल आणि आपलं पितळ उघडं पडतय म्हणून माहिती देण्यास सभासदांना टोलवा टोलवी करणाऱ्याना एवढेच सांगायच की असे करून प्रश्न सुटत नाहीत. तुमचा कारभार स्वच्छ आहे तर पाटबंधारे विभागाला चुकीची माहिती का देता. खोट्या परवाना का घेता. मोठ्या मोठ्या बतावण्या करता.तुम्ही पाणी घेता तर पाणी घेतो असे माहिती लेखी का देत नाही. तुमच काय चालंय हे आता सगळ्या गावाला कळालय…येणारा काळ या गोष्टीला नक्की उत्तर देईल.
दिल्ली अभी बहूत दूर हैं..!!
Discussion about this post