आदिवासी सोसायट्यांच्या प्रश्नांबाबत अजित पवार व झिरवाळ यांच्यात मुंबईत बैठक
प्रतिनिधी नाशिक:-
राज्यातील आदिवासी विकास कार्यकारी सहकारी संस्थांच्या विविध मागण्यांबाबत आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी मुख्यतः आदिवासी शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळण्याची सर्वसाधारण कारणे जाणून घेतली.
ही देखील बातमी वाचा : लोखंडेवाडी गाव व शिवार रस्त्यांसाठी ना. झिरवाळ यांच्याकडून निधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. केंद्र शासनाच्या सन २००८ च्या कर्जमाफी योजनेचा रु. ३०४.६१ कोटी रकमेचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. आजही आदिवासी जनतेची अर्थव्यवस्था ही कृषी व संलग्न व्यवसायावर प्रामुख्यानं अवलंबून असल्याचे नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. त्या अनुषंगानं सदर आदिवासी शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेता यावा, याकरिता योग्य पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post