दारू पिताना किरकोळ वादातून छातीत चाकू भोसकून मित्राने केला मित्राचा खून ; नाशिक जिल्ह्यातील घटना
प्रतिनिधी नाशिक:-
दिनांक ०१/०८/२०२४
दारुच्या नशेत मित्राकडून मित्राचा खून झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे .या घटनेने जिल्ह्याभरात एकच चर्चा सुरू आहे. दोन मित्र सोबत दारू पिण्यासाठी बसले असता.त्यांच्यामध्ये किरकोळ वाद सुरू झाला . व हा वाद इतका वाढला की, एकाने दुसऱ्याच्या छातीत भोसकून हत्या केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील मटाणे येथे संतोष पवार याने आपला मित्र दिपक निंबा साबळे याच्या सोबत दारु पिल्यानंतर किरकोळ वाद झाले त्यातून दिपक साबळे यांच्या छातीत चाकू खूपल्याने दिपक साबळे यांचा मृत्यू झाला आहे. दोघे मित्र हे सकाळ पासून सोबत होते साबळे हे कांद्याचा व्यवसाय करीत होते. दोघांनी सकाळी दारू पिल्यानंतर दोघे घरी गेले मात्र संध्याकाळी संतोष पवार याने पुन्हा मित्र दिपक साबळे यांना बोलवून घेतले आणि त्यातून पुन्हा किरकोळ वाद झाल्यानंतर संतोष पवार याने मित्राच्या छातीत चाकू भोसकल्याने त्याचा मृत्यू झाला,
या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिस घटनास्थळी पोहचत त्या

Discussion about this post